Shocking video: सोशल मीडियावर आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. हे व्हायरल व्हिडिओज नेहमीच लोकांना थक्क करत असतात, कारण यात बऱ्याचदा असे काही दृश्ये दिसून येते जे सहसा लोकांनी कधी पाहिलेले नसते. इथे कधी काही विचित्र घटना व्हायरल होतात तर कधी जीवघेणे अपघात तर कधी इथे थरारक स्टंट्स देखील व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडीओ पहायला मिळातात. मजेशीर, भावनिक, विचित्र, धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. मात्र काही काळापासून असे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये अचानक लोकांचे मृत्यू होत आहेत. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये भयंकर अपघात समोर आला आहे.
हा अपघात इतका भयंकर होता की याचा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजात धडकी भरेल. झालं असं की डीजेचा भलामोठा सेटअप रस्त्यावर उभा होता यावेळी हाच सेटअप खाली उभ्या असणाऱ्या लोकांच्या अंगावर पडला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर डीजेचा मोठा सेटअप आहे, डीजेवर गाणी वाजत आहेत आणि याच गाण्यावर तरुण-तरुणाई थिरकत आहेय डीजेचा हा सेटअप एका गाडीवर असून ही गाडी हळू हळू पुढे सरकत आहे. याचवेळी झाडाची फांदी मध्ये येते आणि यावेळी सेटअप धक्का लागून तो वजनदार सेट खाली कोसळतो. यावेळी खाली उभे असणारे काही तरुण पळून बाजूला जातात तर एका तरुणीच्या आणि चिमुकल्याच्या थेट डोक्यावर हा सेटअप कोसळतो.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भयंकर असा अपघात घडला आहे. यावेळी नक्कीच दोघांनाही गंभीर दुखापत झाली असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ baadshanaushad नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून आता यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रया देत आहेत.