Viral video on social media: आजकाल कामानिमित्त आई आणि वडील दोघांनाही कामानिमित्त घराबाहेर पडावे लागते. त्यामुळे घरातील लहान मुलं घरात एकटीच असतात. ही मुलं कधीकधी एकटीच बाहेर जातात, किंवा पालकच मुलांना दुकानात काहीतरी सामान आणायला पाठवतात. आता मुल मोठं झालं असं आपण मानतो मात्र मुलांना एवढी समज आलेली नसते आणि याचाच फायदा काही लोक घेतात. आणि कधी कधी हे लहान मुलांच्या जीवावरही बेतू शकतं. असाच एक प्रकार सध्या समोर आलेला आहे, एका व्यक्तिने लहान मुलीला एकटीला पाहून तिच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकवण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तुम्हीही तुमच्या लहान मुलांच्या गळ्यात सोन्याच्या वस्तू घालत असाल तर सावधान. तुमच्याही मुलांवर ही परिस्थिती ओढावू शकते. या व्हिडीओमध्ये एका लहान मुलीसोबतची घटना शेअर करण्यात आली आहे. गळ्यात सोन्याची साखळी घालून रस्त्याने चालणाऱ्या मुलीसोबत त्या माणसाने काय केले ते पाहून तुम्हाला धक्का बसेल. या व्यक्तीने प्रथम मुलीच्या गळ्यातील साखळी ओढण्याचा प्रयत्न केला. त्याने अनेकवेळा या मुलीची चेन अनेकवेळा ओढली, त्यामुळे मुलीच्या मानेला दुखापत झाली. मात्र त्यानंतरही चैन न निघाल्यामुळे या तरुणाने त्या चिमुकलीच्या गळ्यातून फासा खोलून चैन काढली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – तुम्ही कधी शार्क माशाचं अंड पाहिलंय का? लाटेसोबत किनाऱ्यावर आलेल्या अंड्याचा VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ पाहून तुम्हीही लहान मुलांना सोन्याच्या वस्तू घालताना शंभर वेळा विचार कराल. दरम्यान हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून पालकांनी सावधगीरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. नेटकरीही व्हिडीओ पाहून संतापले असून लहान मुलीला रस्त्यावर एकटीला सोडल्यामुळे पालकांवर टिका करत आहेत.