Viral Video : खेळ मांडला हे लोकप्रिय मराठी गाणं ऐकलं की अंगावर क्षणभरासाठी काटा येतो. अजय अतुल यांनी गायलेलं हे अप्रतिम मराठी गीत आहे. या गाण्याचे प्रत्येक शब्द काळजाला भिडतात. या गाण्याचे तीन कडवे आहे पण तुम्हाला माहिती आहे का या गाण्याचं आणखी एक कडवं आहे जे अजूनही रिलीज केलेलं नाही. होय, हे कडवं ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. लोकप्रिय गायक अजय गोगावले यांनी हे कडवं गाऊन दाखवले आहे. त्यांचे हे कडवं सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. अनेक लोकांना हे कडवं खूप आवडले आहे.

हा व्हायरल व्हिडीओ कोण होणार करोडपती या कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमातील अजय गोगावले यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की सचिन खेडकर म्हणतात, खेळ मांडला हे कुठेही आणि केव्हाही गाणं ऐकलं तरी अंगावरती काटा येतो आणि त्या खेळ मांडलाचं असंही एक कडवं आहे की जे बाहेर आलेलं नाही आणि तुम्ही केलेलं होतं. ते काय होतं कडवं? एक झलक.” यानंतर गायक अजय गोगावले हे कडवं अतिशय सुरेल आवाजात म्हणून दाखवतात. त्यांचं हे कडवं ऐकून तुम्हीही क्षणभरासाठी स्तब्ध व्हाल. या कडव्याचे प्रत्येक शब्द काळजात घर करतात. हे कडवं काय, हे ऐकण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ नीट पाहावा लागेल.

Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे
Loksatta Lokrang Where did these insults on Holi originate and how did they develop
निमित्त: शिव्या-महापुराण

हेही वाचा : “गरम गरम भजी बरोबर नरम नरम पाव..” तरुणीने घेतला भन्नाट उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल

ifeelmarathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “खेळ मांडला unreleased” हा व्हिडीओ ऐकून अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सलाम आहे तुमच्या कर्तुत्वाला सर” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान आहे कविता” आणखी एका युजरने लिहिलेय, “मला शब्द सुचत नाही खूप सुंदर” अनेक युजर्सना या कडव्याचे लिरिक्स खूप आवडले आहेत.
अजय अतुल हे भाऊ असून त्यांनी अनेक लोकप्रिय गाणे गायली आहेत. एक प्रसिद्ध संगीतकार जोडी म्हणून ते ओळखतात. त्यांचे अनेक चाहते आहेत.