एका रुग्णाने उपचारानंतर डॉक्टरांना फीज म्हणून खेळण्यातील नोट दिल्याची घटना समोर आली आहे. रुग्णाने दिलेल्या त्या नोटीची रचना मूळ नोटीशी अगदी मिळती- जुळती होती, परंतु त्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाऐवजी चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडिया असे लिहिले आहे. नोटेवर लिहिलेले बँकेचे नाव डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना आपली फसवणुक झाल्याचे समजले. या फसवणुकीचा मजेशीर किस्सा त्यांनी हसून सोशल मीडियावर शेअर केला आहे.

डॉक्टराने आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीची ही गोष्ट थ्रेड्स अॅपवर शेअर केली आहे. फसवणूक झालेल्या डॉक्टराचे नाव ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. मनन व्होरा असे आहे. त्यांना एका रुग्णाकडून ५०० रुपयांची बनावट नोट कशी मिळाली याबद्दल सांगितले आहे. अलीकडेच एक रुग्ण त्यांच्याकडे उपचार करण्यासाठी आला होता. यावेळी त्याने रोख पैसे दिले. यावेळी त्याने दिलेल्या नोटा माझ्या रिसेप्शनिस्टने न तपासता घेतल्या. डॉक्टरांची ही फसवणूक घटना पाहून लोक किती हुशार असतात हे दिसते. त्या रुग्नाला हे माहित नव्हते आणि त्याने हे चुकून केले असेल यावर विश्वास ठेवण्यास माझा नकार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
https://www.threads.net/t/CuZo0U5JK_H/

पण असो, मला ही घटना पाहून खूप हसू आले, माझी ५०० रुपयांसाठी फसवणूक झाली असली तरी मी एक मजेशीर आठवण म्हणून आता ही नोट माझ्याकडे जपून ठेवली आहे. या पोस्टवर युजर्स आता अनेक कमेंट्स करत आहे. काहींनी रुग्णाने डॉक्टरांची अशाप्रकारे फसवणूक करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी सहानुभूती दर्शवत नकली नोट सहज ओखळणे कठीण असल्याचे म्हटले आहे.