‘प्रिमअम पेट्स’ आणि ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली अपडाऊन’ यांच्या संयुक्त विद्यामानाने डोंबिवली येथे डॉग फॅशन शो आजोजित करण्यात आला होता. या फॅशन शोमध्ये २२ जातींच्या श्वानांचा सहभाग होता. विविध जातींच्या श्वानांनी, नानाप्रकारचे कपडे परिधान करून रॅम्पवॉक केला. या शोमध्ये सहभागी झालेल्या एका श्वानाच्या मालकाने त्याला २००० च्या नोटांची माळ घालून सजवून आणले होते. या जोडीने अनेकांचे लक्ष आकर्षित केले. मोदीच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे पडसाद या फॅशन शोमध्ये पाहायला मिळाले.
प्रिमअम पेट्स आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली अपडाऊनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात २२ प्रजातींच्या २०० श्वानांनी सहभाग घेतला होता. सायबेरीन हास्की, सेंट बर्नाड, माऊंटन डॉग, चुहाहुआ, पॉकेट पॉम डॉग, पोलिस डॉग, लॅब्रडॉर, जर्मन शेफर्ड, जॉईंट ब्रिड, डॉबरमॅन अशा अनेक प्रजातींचे श्वान यात सहभागी झाले होते. हा अनोखा फॅशन शो पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी नेरळ, कर्जत, नवी मुंबई यांसाख्या भागातून श्वान आले होते. ३ हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगलेल्या या फॅशन शोमध्ये २ हजारांच्या नोटांची माळ घातलेल्या श्वानाने अनेकांचे लक्ष स्वत:कडे खेचले.