Dombivali Honda Activa Fire: बाईक अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. तरूणाईमध्ये या बाईकची क्रेझ दिसते. अनेकजण आपल्या बाईकला एवढं जपतात की त्यावर आलेला एक ओरखडाही त्यांना सहन होत नाही. पण सध्या एक व्हीडिओ वाऱ्या सारखा व्हायरल होतोय. यात अॅक्टिव्हा स्कूटरला आग लागलेली पाहायला मिळतेय. सध्या कधी पाऊस कधी उष्णतेचे वातावरण आहे, सर्वत्र उष्णतेच्या लाटेची दहशत आहे. अशा परिस्थितीत माणसे आणि वाहनेही उष्णतेचे बळी ठरत आहेत. रोज बाइक आणि कार जाळल्याचे व्हिडीओ समोर येतात. अशा परिस्थितीत सोशल मीडियावरही वाहनांना आग लागल्याच्या बातम्या येत आहेत. यावेळी जर तुम्हीही स्कूटी चालवत असाल तर हा व्हिडीओ पाहाच. कारण यात तुमचा जीवही जाऊ शकतो. असाच एक डोंबिवलीतला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

डोंबिवली मिलापनगर भागात दुपारच्या सुमारास होंडा अॅक्टिव्हा स्कूटीला अचानक आग लागल्याची घटना घडली. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भर रस्त्यात एका स्कूटीला आग लागल्याचं दिसत आहे. स्कूटीचं इंजीन तापल्यामुळे गाडीनं पेट घेतल्याचं समोर आलं आहे. स्कूटीमधून धूर निघत असल्याचे पाहून तिथे उपस्थित लोकांनी बाईकवर पाणी ओतण्यास सुरुवात केली. आजूबाजूचे लोक पाण्याच्या पाईपमधून आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा येईल. दरम्यान यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र यामध्ये कोणाचाही बळी जाऊ शकतो, त्यामुळे वाहनांची वरचेवर सर्विसिंग होणे गरजेचे आहे. नाहीतर तुमची एक चूक आयुष्य संपवू शकते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> एक वेळ, एक ठिकाण अन् ३ सेकंदात दोघांचा मृत्यू; बाईकची स्कॉर्पिओला धडक पण चूक नक्की कुणाची? पाहा VIDEO

आपल्या गाडीमधील इंजिन ऑइल वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे. चारचाकी वाहनांपेक्षा दुचाकी गाड्या अधिक प्रमाणात फिरवल्या जातात; ज्याचा परिणाम थेट त्याच्या इंजिनवर होत असतो. असे असताना, आपल्या गाडीने सुरळीत आणि कोणत्याही प्रकारचा त्रास न देता चालावे असे तुम्हाला वाटत असल्यास वेळोवेळी इंजिन ऑइलची पातळी तपासून पाहावी. त्यासह गाडीमध्ये कुठे लिकेज नाही ना, हेही पाहावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गाडी किती दिवसांनी सर्व्हिसिंग करणे गरजेचे असते किंवा किती किलोमीटर प्रवास झाल्यानंतर गाडी सर्व्हिसिंगसाठी आणावी हे वाहन विकत घेताना सांगितले जाते. त्या वेळा न चुकता पाळायला हव्या. तसेच गाडी जुनी झाल्यांनतरही ठराविक कालावधीनंतर मेकॅनिककडे जाऊन एकदा गाडी तपासून, तिची सर्व्हिसिंग करायला हवी.