निसर्ग आपल्याला भरभरून देतो म्हणूनच आपण जीवंत आहोत. शुद्ध हवा, अन्न, पाणी, निवारासह आपल्या सभोवताली असलेली प्रत्येक गोष्ट ही निसर्गाची देणगी आहे. पण माणसाला मात्र परोपकारी आणि स्वार्थी झाला आहे. नैसर्गिक संसाधनाचा जीवनावश्यक गरजांच्या पलिकडे जाऊन उपभोग घेताना निसर्गाचा ह्रास करत आहे. याच प्रयत्नात माणूस जेव्हा सर्व मर्यादा ओलांडतो तेव्हा निसर्ग देखील रौद्ररुप धारण करतो. माणसाला त्याच्या चुकांची जाणीव करून देतो आणि निसर्गाचे संवर्धन करण्याची चेतावणी देतो. निसर्गाचा हा रुद्रावता आपल्याला भूकंप, पूर, चक्रीवादळ, दुष्काळ, भूस्खलन, ज्वालामुखीचा उद्रेक आणि सुनामी अशा कित्येक नैसर्गिक आपत्तींचा सामना मानवाला करावा लागतो. निसर्गाला हलक्यात घेणे माणसाला नेहमीच महागात पडते. निसर्गाचे रौद्ररुपाची झलक दाखवणारा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका व्हायरल व्हिडिओमध्ये दक्षिण चीनमध्ये काही सेकंदातच एक पाच मजली इमारत जवळच्या नदीत कोसळल्याचे दिसून आले आहे. मुसळधार पाऊस आणि पूर आल्याने ही घटना घडल्याचे समजते आहे. इमारत बांधकामाधीन असल्याचे दिसते आणि यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. इमारतीखालील जमीन ढासळल्याने इमारत जवळच्या नदीत कोसळली.ही घटना चीनच्या शिन्झोऊ शहरात लेंगशुई नदीजवळ घडली. ३० जून ते १ जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार पावसात, शिन्झोऊमधून वाहणाऱ्या लेंगशुई नदीला २००५ पर्यंतचा सर्वात मोठा पूर आला, असे जलसंपदा मंत्रालयाचा हवाला देत एका वेगळ्या स्थानिक माध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे. या अहवालात वाचकांना अचानक पुराची सुरुवातीची चिन्हे कशी ओळखायची याबद्दल देखील सूचना देण्यात आल्या आहेत.

हा व्हिडिओ @ABC ने पूर्वी ट्विटरवर X म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला होता. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की, “दक्षिण चीनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे बांधकामाधीन असलेली पाच मजली इमारत जवळच्या नदीत कोसळली कारण तिच्याखालील जमीन अचानक खाली गेली.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरंतर, सततच्या पावसामुळे दक्षिण चीनमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ २४ हजार वेळा पाहिला गेला आहे. अनेक वापरकर्त्यांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘मेड इन चायना’, तर दुसऱ्याने लिहिले, ‘त्याच्या निर्मितीवर कोणतीही चर्चा होऊ नये.’