Jugaad Video: सोशल मिडियावर कधी काय व्हायरल होईल यांचा अंदाज लावणे कठीण आहे. कधी कोणी कारपासून हेलिकॉप्टर तयार करतं तर कधी कोणी जुगाड करून विटेपासून कुलर तयार करतो. आता पुन्हा असाच नवा जुगाड व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ पाहून प्रत्येकजण हैराण होत आहे. व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने देशी जुगाड करून असे काही केले आहे जे पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो. खरंतर रिक्षाचालकाने जुगाड करून त्याच्या रिक्षापासून व्हॅगेनर कार तयार केली आहे. ही आगळी वेगळी रिक्षा रस्त्यावर धावताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. लोकांनी जेव्हा रिक्षा पाहिली तेव्हा ते थक्क होऊन पाहातच राहिले.

जुगाड करून रिक्षाची बनवली व्हॅगनार कार

या जुगाडसाठी चालकाने जुन्या गाडीचे काही भाग वापरले आहेत आणि आपल्या रिक्षाच्या मागच्या बाजूला व्हॅगनार कारचा मागचा भाग जोडला आहे. जर तुम्ही जेव्हा हे गाडी पाहाल तेव्हा तुमचा गोंधळ होईल की ही कार आहे की रिक्षा? तुम्ही मागून या वाहनालाअसे वाटेल की कार आहे पण जेव्हा तुम्ही जवळ जाऊन पाहाल तेव्हा ती रिक्षा असल्याचे लक्षात येईल. व्हिडिओ पाहून तुम्हाला ही प्रश्न पडेल की या चालकाला असा जुगाड करण्याची कल्पना सुचली कशी असेल.

हेही वाचा : ”हा आंब्याचा अपमान!” मँगो पाणीपुरीनंतर, व्हायरल होतोय मँगो पिझ्झा, विचित्र फूड फ्युजनमुळे आंबा प्रेमी संतापले

पाहा व्हिडिओ

रिक्षाची कार बनविण्यासाठी चालकाने चेरी रंगाची जुनी व्हॅगनार कार VXI मॉडेलाचा भाग वापरला आहे ज्यावर हरियाणाची नंबर प्लेट दिसत आहे. जेव्हा या आगळ्या वेगळ्या व्हॅगनार कार लोकांना रस्त्यावर फिरते तेव्हा लोक थक्क होतील. जो व्यक्ती या गाडीच्या आजूबाजूने जात असेल तर तो आपला मोबाईल काढून व्हिडिओ रेकॉर्ड करतात.

एनडीटिव्हीने दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा चालकाने सांगितले की, त्याने एका रिक्षाला व्हॅगनार कार सांगून प्रवाशांना बसवतो तेव्हा लोक आनंदाने आणि उत्साहाने गाडीत बसतात.

हेही वाचा : तुम्ही कधी पिवळं कलिंगड खाल्लं आहे का? चवीला अत्यंत गोड असलेल्या ‘या’ फळाबाबत जाणून घ्या

अफलातून जुगाड करणाऱ्या चालकाचे होतेय कौतूक

रिक्षावाल्याचे म्हणणे आहे की, भलेही तो व्हॅगनार कार खरेदी करू शकत नाही पण तो त्याचा आनंद घेऊच शकतो. म्हणून त्याने जुगाड करून आपल्या रिक्षाची व्हॅगनार कार तयार करण्याचा निर्णय घेतला. हा जुगाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि लोक चालकाचे कौतूक देखील करत आहे. या व्हिडिओला ट्विटरवर @ragiing_bull नावाच्या अकाऊंटवरून शेअर केल्याची दिसते आहे. पण हा व्हिडिओ जुना आहे. आता सोशल मीडियावर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले आहे आणि लाखो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्हाला हा जुगाड कसा वाटला? आम्हाला नक्की कळवा?