VIDEO: दारूच्या नशेत प्रवाशानं विमानात घातला गोंधळ; व्हिडीओ व्हायरल!

दारू पिऊन नशेत असलेल्या प्रवाशांना हाताळणं फ्लाइट अटेंडंटला कधी कधी इतकं अवघड होतं की अखेर त्यांना पोलिसांची मदत घ्यावी लागते.

drunk-man-in-flight-goes-viral
(Photo: Twitter/ Jeremy Harris)

सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. विमानात प्रवाशांनी घातलेल्या गोंधळाचे व्हिडीओ तर फार मनोरंजक असतात. असे व्हिडीओ पाहून काही काळ मनोरंजन तर होतंच. पण दुसरीकडे, असेही काही व्हिडीओ असतात, जे पाहून हसू रोखणं अशक्य बनतं. असे व्हिडीओ पाहून काय प्रतिक्रिया द्यावी हेही कळत नाही. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ असाच काहीसा आहे. विमानात एका प्रवाशाने दारूच्या नशेत गोंधळ घातला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

एअरलाइन्सच्या विमानातून प्रवास करताना लाऊंजमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी तीन पेग दिले जातात. पण प्रवाशांना दिली जाणारी ही सेवा विमानातील कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतेय. दारू पिऊन नशेत असलेल्या या प्रवाशांना हाताळणं फ्लाइट अटेंडंटला कधी कधी इतकं अवघड होतं की अखेर त्यांना पोलिसांची मदत घ्यावी लागते. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडलाय.

एअरलाइन्सच्या फिलाडेल्फिया फ्लाईटमध्ये हा प्रकार घडलाय. विमानात दारू प्यायल्यानंतर या प्रवाशाने गोंधळ घालण्यास सुरूवात केली. हा प्रवासी फ्लाइट अटेंडंटसोबत हुज्जत घालताना दिसून येतोय. इतर प्रवाशांवर देखील तो ओरडताना दिसून येतोय. यातील फ्लाईट अटेंडंट त्याला सीटवर बसण्यासाठी सांगत असताना त्याने अटेंडंटला सुद्धा अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. इतकंच नव्हे तर क्रूच्या एका महिला सदस्याला गळफास लावून त्याच्या सीटवर टेप केलं होतं. प्रवाशाचा हा गोंधळ पाहून विमानात एकच खळबळ माजली होती. सर्व प्रवासी घाबरूनही गेले होते.

आणखी वाचा : चक्क बोगद्यातून उडवलं विमान, गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डमध्ये नोंद; थरकाप उडवणारा व्हिडीओ पाहाच…

टिमोथी आर्मस्ट्राँग असं या प्रवाशाचं नाव आहे. हा प्रवासी फिलाडेल्फिया इथून विमानात बसला असून तो मियामीला उतरणार होता. विमानात बसल्यानंतर त्याने दोन पेग दारू घेतली आणि त्यानंतर दारूच्या नशेत त्याने विमानात गोंधळ घालण्यास सुरूवात केली.

या घटनेनंतर दारूच्या नशेत असलेल्या प्रवाशाला सॉल्ट लेक सिटी पोलिसांनी अटक केली. त्याला शांत होण्यास सांगितल्यानंतर तो वर्णद्वेषी, लैंगिकतावादावर कमेंट्स करत होता.

आणखा वाचा : उकळत्या पाण्यात ध्यान करत बसलेल्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल; नेटकऱ्यांचा फसवेगिरीचा दावा

विमानातील प्रवाशाने दारूच्या नशेत घातलेल्या गोंधळाचा हा व्हिडीओ KUTV2News चे रिपोर्टर जेरेमी हॅरिस यांनी ट्विटरवर शेअर केला. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये काळ्या मास्कने चेहरा झाकताना हा प्रवासी परिचारकाकडे एखाद्या प्राण्यासारखा गुरगुरताना दिसत होता.

याच विमानात असलेला एका सहप्रवासी डेनिस बुश याने या प्रवाशांचा गोंधळ आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या या प्रवाशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Drunk man in flight goes on a vile rant grows like an animal at attendants arrested prp