मद्यपान हे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे माहित असूनही अनेक लोक मद्यपान करतात. अनेकदा लोक इतके मद्यपान करतात की त्यांना कसलेच भान राहत नाही. आपण काय करत आहोत हेच मद्यपी व्यक्तीला समजत नाही. असाच काहीसा प्रकार कानपूरमधील एका व्यक्तीबरोबर घडला आहे. हा व्यक्तीनी इतके मद्यपान केले होते की त्याला कसलीच शुद्ध राहिली नव्हती. एका बागेमध्ये झोपलेल्या या मद्यधुंद व्यक्तीचे डोके बाकामध्ये अडकले होते. त्याला वाचवण्यासाठी पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांच्या तात्काळ मदतीमुळे वेळीच त्याचा जीव वाचवण्यात आला.

हेही वाचा – “मी धोनीसाठी आली आहे!”, ८२ वर्षीय आजीची सर्वत्र हवा! Viral Video एकदा बघाच

हा मद्यपी व्यक्ती रामलीला पार्कमधील एका बाकावर झोपला होता. झोपेतच तो बाकावरून खाली पडला पण त्याच डोकं मात्र रिकाम्या जागेत अडकले होते. त्यामुळे त्याला खूप वेदना होत होत्या आणि तो जोरजोरात ओरडत होता. त्याने इतके मद्यप्राशन केले होते तो स्वत:ला त्यातून बाहेर शकत नव्हता. दरम्यान त्याचा आवाज ऐकून तेथे काही लोक जमा झाले. लोकांनी तात्काळ पोलिसांना कळवले. माहिती मिळताच घटनास्थळी त्याला वाचवण्यासाठी उद्यानात दोन पोलिसही उपस्थित झाले. खूप प्रयत्न करून पोलिसांनी त्याचा जीव वाचवला.

हेही वाचा – मोमोच्या दुकानात हवाय मदतनीस, जाहिरात होतेय व्हायरल, पगाराचा आकडा पाहून प्रत्येकाला हवी आहे ही नोकरी

POLICE COMMISSIONERATE KANPUR NAGAR या एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुमची सुरक्षा, आमचा संकल्प” उद्यानातील बाकावर एका व्यक्तीची मान अडकल्याने त्याचा जीवार धोका असल्याची माहिती स्वरूप नगर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या रामलीला पार्कमध्ये रात्री ०१.०० वाजताच्या सुमारास मिळाली. माहिती मिळताच चौकीचे प्रभारी बेनाझबार उपनिरीक्षक श्री कविंद्र खटाना, प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक आणि हवालदार चित्रा कुमार यांनी तात्काळ उद्यानात पोहोचून व्यक्तीची मदत केली आणि अत्यंत सावधगिरीने आणि संयमाने त्याची अडकलेली मान सुखरूप बाहेर काढली. त्यावर उपचार केले.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक व्हिडिओवर खूप कमेंट करत आहेत आणि कानपूर पोलिसांचे कौतुक करत आहेत.