जास्त व्यसन केल्याने माणूस बेशुद्ध होतो किंवा त्याचे संतुलन बिघडते. अशा मद्यधुंद लोकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील असाच एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक तरुणी पोलिस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन करताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मद्यधुंद तरुणी पोलिसांसह टॅक्सी ड्रायव्हर आणि रस्त्यावरील लोकांना धक्काबुक्की करत आहे. नुकताच हा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. तरुणीचे हे गैरवर्तन पाहून संतापलेल्या टॅक्सी चालकाने आणि वाटसरूंनी तिचा व्हिडीओ बनवला. रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांशीही ती गैरवर्तन करत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुलीसोबत इतरही मुली होत्या. सर्व मुली नशेत होत्या.

गाडीत बसलेल्या प्रवाशांना उतरवायची अनोखी पध्दत पाहिली का? पाहा Viral Video

या व्हिडीओमध्ये आपण पोलिसांची गाडीही पाहू शकतो. या मुलीने पोलीस कर्मचाऱ्यालाही सोडले नाही. मुलीच्या सततच्या गैरवर्तनानंतरही पोलीस अधिकारी शांत राहून तिला लांब करण्याचा प्रयत्न करत होता. व्हिडीओमध्ये ती मुलगी पोलीस कर्मचाऱ्याचा मास्क हिसकावताना दिसत आहे. व्हिडीओमधील ठिकाण स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र हा व्हिडीओ मुंबईतील कुठल्यातरी भागातील असल्याचे दिसत आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या शर्टावरील बिल्ला हा महाराष्ट्र पोलिसांचा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्लिपमध्ये पोलीस कर्मचारी फोनवर कोणाशी तरी बोलत असल्याचे दिसत आहे. तर, रस्त्याच्या मधोमध, मुलगी पोलीस कर्मचाऱ्यांची कॉलर धरून त्याला धमकावताना दिसत आहे. त्यानंतर तरुणीने या कर्मचाऱ्याचे केस ओढून त्याला लाथ मारण्याचाही प्रयत्न केला. महिलेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. या व्हिडीओवर कमेंट करत लोकांनी तरुणीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.