नवरात्र हा देवी दुर्गेच्या आराधनेचा आणि तिच्या शक्तीचं स्मरण करण्याचा उत्सव आहे. हा उत्सव वर्षातून दोनदा येतो – चैत्र नवरात्र आणि आश्विन नवरात्र. विशेषतः आश्विन महिन्यातील नवरात्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देवी दुर्गेने महिषासुर नावाच्या राक्षसाचा पराभव केला होता त्यामुळे तिला महिषासुर मर्दिनी म्हटले जाते. नऊ दिवस देवीने असुरांबरोबर युद्ध केले अन् दहाव्या दिवशी महिषासुराचा वध केला. त्यामुळे हा नवरात्र हा सत्याचा असत्यावर, धर्माचा अधर्मावर आणि शक्तीचा दुष्टतेवर विजय दर्शवतो. नवरात्रामध्ये देवीच्या नव रूपांची उपासना केली जाते. प्रत्येक दिवस एका विशिष्ट रूपाला समर्पित असतो. त्यामुळे हा उत्सव स्त्रीशक्तीचं प्रतीक मानला जातो. या काळात

नवरात्रोत्सव देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. महाराष्टात घटस्थापना करून नवरात्राची सुरुवात होते. कलशात पाणी, नारळ, आंब्याची पानं ठेवून देवीची स्थापना केली जाते. नवरात्रभर देवीला सकाळ-संध्याकाळ पूजा केली जाते. भक्त नवरात्रात उपवास करतात. काही लोक फक्त फळं व उपवासाचे पदार्थ खातात, तर काही जण अखंड उपवास करतात. हे शरीरशुद्धी व मनशुद्धीचे प्रतीक मानले जाते.

नवरात्राच्या काळात गुजरातमध्ये गरबा आणि डांडिया खेळले जातात, महाराष्ट्रात देवीच्या आरासेचे दर्शन व भजन-कीर्तन आयोजित केले जातात, तर उत्तर भारतात रामलीला आणि दुर्गापूजेसारखे सोहळे होतात. काही ठिकाणी देवीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. दररोज देवीला वेगवेगळ्या रंगांची वस्त्रं, फुले, अलंकार घालून सजवले जाते. प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट रंग महत्त्वाचा असतो, जो भक्तांच्या जीवनातील सकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो. लाखो भक्त देवीचे सजलेले सुंदर आणि प्रसन्न रुप पाहण्यासाठी येतात पण तुम्ही कधी असा विचार केला आहे की, देवीचा हा शृंगार नक्की कसा केला जातो. देवीला रोज वेगवेगळ्या शुभ रंगाची साडी नेसवली जाते. सुंदर अलंकार परिधान केले जातात. फुलांची आरास केली जाते. पण हे सर्व कसे करतात हे तुम्ही कधी पाहिले आहे का? नसेल तर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ नक्की बघा.

व्हायरल व्हिडिओ viraj_patil_makeup_and_hairनावाच्या पेजवरून शेअर केला आहे ज्यामध्ये विराज पाटील नावाच्या कलाकार देवीच्या मुर्तीचा अप्रतिम श्रृंगार करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तो तरुण अत्यंत कुशलतेने देवीच्या मुर्तीला साडी परिधान करतो. साडीचा पदर, पदराची एक एक निरी व्यवस्थित करताना दिसतो. देवीची मुर्तीच्या केसांची सुंदर वेणी घालतो आणि केसांमध्ये सुदंर फुले माळतो. सुंदर सुंदर दागिणे पा चढवून सौंदर्यामध्ये भर घालतो. त्यानंतर देवीच्या हातामध्ये एक एक शस्त्र देतो. हे सर्व तो इतक्या कुशलतेने करत आहे की व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिल्यानंतरही मनाचे समाधन होत नाही. सध्या नवरात्रोत्सव सुर आहे त्यामुळे नऊ दिवस देवीच्या नव रुपांचा शृगांर तुम्हाला पाहायला मिळेल.

शैलपुत्री देवीचा शृंगार

शैलपुत्री (Shailaputri) ही हिमालयराज हि्मवतची कन्या आहे आणि हिंदू माता देवी महादेवीचे रूप आहे, जिचे एक स्वरूप देवी पार्वती म्हणून ओळखले जाते. ती नवदुर्गांपैकी पहिले रूप आहे, जिने नवरात्राच्या पहिल्या दिवशी पूजली जाते.

ब्रह्मचारिणी देवीचा शृंगार

ब्रह्मचारिणी देवी ही देवी दुर्गाचे दुसरे रूप आहे. ही तपस्या आणि भक्तीचे प्रतीक आहे आणि नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी पूजली जाते.

माता चंद्रघंटेची कथा | नवरात्रीचा तिसरा दिवस

माता चंद्रघंटा या देवी दुर्गेचे शक्तिशाली आणि तेजस्वी रूप असून त्यांची पूजा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी केली जाते. त्यांच्या नावाचा संदर्भ कपाळावर असलेल्या अर्धचंद्राकृती घंटेशी आहे. त्या दहा भुजा असलेल्या, सोनेरी वर्णाच्या, आणि सिंह किंवा वाघावर आरूढ झालेल्या योद्धा स्वरूपात दर्शवल्या जातात. त्या सौंदर्य, शांतता आणि शौर्य यांचे प्रतीक आहेत. त्यांच्या पूजेमुळे साधकाला अंतर्गत संतुलन, धैर्य, तसेच नकारात्मक उर्जांपासून संरक्षण मिळते, असे मानले जाते.

व्हि़डीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. व्हिडीओवर कमेंट करत अेकांनी कलाकारच्या कलेचं कौतुक केले आहे.

व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहीले की, सकाळ व्हावी आणि तुमचे दोघांचे दर्शन व्हावे …..नयन रम्य सुख. कला आहे तुमच्या हातात.

दुसऱ्याने कमेंट केली की, नऊ दिवसांचे रूप बघण्यासाठी अख्ख वर्ष वाट बघाव लागते. मुख्य म्हणजे दरवेळी नवीन रुप पाहायला मिळते.