एका महिन्यापूर्वी दिल्ली मेट्रोच्या एका प्रवाशाने त्याच्या मुलाला रुळांवर लघवी करू दिल्याबद्दल टीका झाली होती. त्यानंतर आता, आता नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात एक माणूस मेट्रो कोचमध्ये लघवी करताना दिसतो. हा संतापजनक व्हिडिओ भारतातील सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे याचे भान लोकांना राहिले नाही आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखली पाहिजे याची देखील पर्वा नाही हे दर्शवत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी रोष व्यक्त केला.
वृद्धाने दिल्ली मेट्रोमध्ये थेट लघवी केली
व्हायरल व्हिडिओ X (पूर्वीचे Twitter) हँडल @tanmoyofc ने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस दोन कोचेसच्या जंक्शनवर उभा राहून लघवी करताना दिसतो, तर सभोवतालचे प्रवाशांना हे पाहून धक्का बसलेला दिसत आहे पण कोणीही त्याला अडवत नाही. या प्रकरणाबाबत दी इंडियन एक्स्प्रेसने दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनशी संपर्क साधला आहे पण अद्यार त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
व्हायरल व्हिडिओ येथे पाहा:
हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाला आणि जवळपास दोन लाख व्ह्यूज मिळवले. अनेक नेटिझन्सने संताप व्यक्त केला, सार्वजनिक शिस्त आणि स्वच्छतेच्या मूलभूत नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. काही युजर्सने मात्र माणूस वैद्यकीय कारणास्तव असे करत असल्याती शक्यता गृहीत धरून त्याचे समर्थन केले.
व्हायरल Video पाहून नेटकरी चक्रावले
टिका करत एकाने लिहिले, “त्यांना वाटते की स्वच्छता आणि नागरी भान हे त्यांची जन्मसिद्ध हक्के नाहीत, तर त्यांचे शत्रू आहेत.”
तर दुसऱ्या लिहिले की,”अशा प्रकारचे लोक समाजासाठी खूप धोका आहेत.”
तिसऱ्याने म्हटले की, “त्यांना मधूमेहाशी संबंधित काही समस्या असू शकते ज्यामुळे अचानक अत्याधिक लघवी होण्याची गरज निर्माण होते. माझ्या वैयक्तिक अनुभवात मी पाहिले आहे की,”ग्रामीण पार्श्वभूमीचे लोक शहरी सार्वजनिक ठिकाणी काही लोकांपेक्षा अधिक चांगले वागत असतात.”
व्हिडिओ पाहून राग अनावर झालेल्या एकाने थेट रोष व्यक्त करत म्हटले की,,”त्याला ट्रेनमधून बाहेर का फेकत नाहीत?”
ऑगस्टमध्ये देखील अशाच प्रकारची घटना समोर आली होती, जिथे इंद्रलोक मेट्रो स्टेशनवर एक वडील आपल्या लहान मुलगा प्लॅटफॉर्मच्या काठावर उभे राहून लघवी करण्याची परावनगी देतात, तेही अगदी ट्रेन येण्याच्या काही क्षणांपूर्वी.
व्हिडिओमध्ये वडील थांबून पाहत असतो, तर जवळच्या एका व्यक्तीने, दृश्य शुट केले आणि सोशल मीडियावर शेअर केले. सोशल मीडियावर टीका करत म्हटले: “त्यांना लाज नाही. ते आपला मुलाला सार्वजनिक ठिकाणी लघवी करायला लावत आहेत… इंद्रलोक मेट्रो स्टेशनवर.”