Elephant And Bull Viral Video : रस्त्यावर अनेकदा भटके किंवा पाळीव प्राणी फिरताना दिसतात. कुत्रे, बैल, गायी, म्हशी हे प्राणी तर सर्रासपणे दिसून येतात. पण हे प्राणी कधी कधी येणा-जाणाऱ्या लोकांवर हल्ला करतात. त्यामुळे लोकांच्या मनात या प्राण्यांविषयी दहशत पाहायला मिळते. सध्या अशाच पिसाळलेल्या बैलाचा अन् हत्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात पिसाळलेल्या बैलाच्या मागे एक हत्ती पळत सुटतो, यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या लोकांना हत्ती थेट तुडवण्याचा प्रयत्न करतो. हा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ तुम्हीही एकदा पाहाच.

व्हिडीओत एक हत्ती बैलाला मारण्यासाठी त्याचा पाठलाग करताना दिसत आहे. बैल पुढे धावत आहे आणि हत्ती त्याच्या मागोमाग धावतोय. याचवेळी हत्ती लोकांना चिरडण्याचाही प्रयत्न करतो.

व्हिडिओमध्ये पाहू शकता की, बैल आणि हत्ती दोघेही रस्त्यावर गोंधळ घालताना दिसत आहेत, यावेळी दोघांना पाहून पादचाऱ्यांमध्ये आणि वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. पिसाळलेल्या बैलामागे हत्तीला पळताना पाहून लोक इकडे तिकडे धावू लागतात. यावेळी हत्ती बैलाला सोडून थेट एका दुकानात शिरतो आणि लोकांना चिरडण्याचा प्रयत्न करतो पण लोक कसेबसे आपला जीव वाचवतात. यावेळी हत्ती रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान करत पुढे निघून जातो. या घटनेचा व्हिडिओ रस्त्यावर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने कैद झाला आहे. जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा धक्कादायक व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबतची अचूक माहिती समोर आलेली नाही. पण हा व्हिडीओ एक्सवर @gharkekalesh नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्यावर युजर्सही विविध कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, “हे बॉलिवूडच्या नवीन अ‍ॅक्शन सीनसारखे दिसतेय, बैल आणि हत्तीची जोडी अद्भुत आहे!” दुसऱ्याने चिंता व्यक्त करत लिहिले की, “ही हसण्याची गोष्ट नाही. रस्त्यावर असे प्राणी असणे धोकादायक आहे. प्रशासनाने लक्ष द्यावे.” तिसऱ्याने लिहिले की, “हे दृश्य भारतात नवीन नाही, ते फक्त कॅमेऱ्यात कैद झाले आहे.”