Elephant Vs Horse video: सोशल मीडियावर तुम्ही अनेक धक्कादायक व्हिडीओ पाहिले असतील, जे पाहून तुम्हाला नक्कीच हसू आले असेल. वन्यजीवांबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होतात. अशातच आता हत्ती आणि घोड्याच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या लढाईत कोण जिंकतं तुम्हीच पाहा. कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते. त्यासाठी ठरावीक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते. अशाच एका घोड्यानं महाकाय हत्तीला आस्मान दाखवलंय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं.
मध्य प्रदेशातील रतलाममधून एक अनोखा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. इथे एका पांढऱ्या घोड्याने चक्क हत्तीला नमवले. घोड्याने असे शौर्य दाखवले की, हत्तीलाही माघार घ्यावी लागली. या अनोख्या लढाईत हत्तीला हार मानून पळ काढावा लागला. ही घटना रतलाममधील पल्सोडा गेटजवळ घडली. तिथे एक महाकाय हत्ती आपल्या माहूतासोबत रस्त्यावरून जात होता. त्याचवेळी काही कारणास्तव हत्ती अचानक अनियंत्रित झाला आणि जवळच्या दुकाने व घरांजवळ धुमाकूळ घालू लागला. लोक घाबरले. काहीजण दूरून व्हिडिओ बनवू लागले, पण त्या हत्तीसमोर उभे राहण्याचे धाडस कुणीही करू शकले नाही. तेवढ्यात, तिथे एक पांढरा घोडा दिसला. असे म्हटले जात आहे की, हा घोडा जवळच राहणाऱ्या एका व्यक्तीचा होता. घोड्याने अनियंत्रित हत्तीला पाहताच, तो त्याच्या दिशेने धावला आणि हत्तीला चावू लागला. घोड्याची चपळता पाहून हत्तीचा राग शांत झाला. तो तिथून निघून गेला.
या झटापटीत घोड्याने केवळ हत्तीसमोरच तग धरला नाही, तर रस्त्याच्या मधोमध अनेक वेळा पाय आपटले आणि मान हलवत हत्तीच्या दिशेने धावला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एवढा मोठा हत्ती घोड्याचा पवित्रा पाहून मागे हटला. हत्तीच्या लाकानं कसंबसं हत्तीला समजावून तिथून दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की, घोडा हत्तीच्या मागे धावत आहे. तो त्याला रस्त्यावरून दूर जाण्यास भाग पाडत आहे. मध्ये काही साधू महाराजही दिसत आहेत जे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
पाहा व्हिडीओ
कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही
जरी लोकांना कोणतीही दुखापत झाली नसली तरी, रस्त्याच्या मधोमध दोन मोठ्या प्राण्यांची टक्कर पाहिल्याने सर्वत्र घबराट पसरली. सोशल मीडिया वापरकर्ते हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत