जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elon Musk) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्यावर निशाणा साधला आहे. बायडेन यांनी नुकतेच अमेरिकन काँग्रेसला संबोधित करताना वाहन कंपन्यांचा उल्लेख केला होता. त्यांनी म्हटले की, ‘फोर्ड (Ford) आणि जनरल मोटर्स (General Motors) यांनी इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासोबतच रोजगार वाढवण्याच्या दिशेने चांगले काम केले आहे.’ यामध्ये बायडेन यांनी टेस्ला (Tesla) या कंपनीचे नाव घेतले नाही. हीच गोष्ट एलन मस्क यांना खटकली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंबंधी ट्विटही करण्यात आले होते. यामध्ये लिहले आहे, ‘फोर्ड कंपनी इलेक्ट्रिकल वाहने बनवण्यासाठी ११ बिलियन डॉलरची गुंतवणूक करत आहे. यामुळे अमेरिकेत रोजगाराच्या ११ हजार संधी उपलब्ध होणार आहेत. याचप्रमाणे जनरल मोटर्स इलेक्ट्रिकल वाहन तयार करण्यासाठी ७ बिलियन डॉलर्स गुंतवणार आहेत. ही इतिहासातील त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक असेल. यामुळे मिशिगनमध्ये रोजगाराच्या ४ हजार संधी उपलब्ध होत आहेत.’

Ukraine War: रशियन मांजरांच्या विदेशगमनास बंदी; ‘हे’ आहे कारण

‘येथे’ समोसे खाण्यास घालण्यात आली आहे बंदी; विचित्र कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

एलन मस्क यांनी या ट्विटला उत्तर म्हणून लिहले आहे की, ‘जी व्यक्ती हे हँडल चालवत आहे, त्या व्यक्तीच्या माहितीसाठी, टेस्लाचे इलेक्ट्रिकल वाहन तयार करताना अमेरिकेमध्ये रोजगाराच्या ५० हजारांहून अधिक संधी निर्माण केल्या आहेत. इतकंच नाही तर जनरल मोटर्स आणि फोर्ड यांच्या एकूण गुंतवणुकीच्या दुप्पटीपेक्षा अधिक गुंतवणूक एकटी टेस्ला करत आहे.’ तसे, टेस्लाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल मस्क यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांवर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत टेस्लाच्या योगदानाकडे बायडेन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मस्क यांनी यापूर्वीही केला आहे. तथापि, एलन मस्क यांच्या अनेक तक्रारींनंतर, बायडेन यांनी या महिन्याच्या सुरुवातीला टेस्लाचा उल्लेख केला. टेस्लाचे सीईओ मस्क यांनी जो बायडेन यांच्याबद्दल अनेकदा आक्रमक टिप्पण्या केल्या आहेत. नुकतेच, असे वृत्तही आले होते की, एलन मस्क सर्वांसमोर राष्ट्राध्यक्षांना काही उलट-सुलट बोलतील या भीतीनेच बायडेन यांची टीम मस्क यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित करू इच्छित नाही.