ट्विटर हे जगात सर्वात जास्त प्रमाणामध्ये वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडिया अ‍ॅप्सपैकी एक आहे. या साईटवर लघुस्वरुपामध्ये पोस्ट शेअर करता येतात. काही महिन्यांपूर्वी अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांनी ट्विटरचे सर्वाधिक शेअर्स विकत घेतले. तेव्हापासून या मोठ्या कंपनीचे मालकी हक्क मस्क यांच्याकडे आहेत. सध्या ट्विटर कंपनी खूप चर्चेत आहे. नुकतेच या कंपनीची भारतामधील नवी दिल्ली आणि मुंबई या दोन मुख्य शहरांमधील कार्यालये बंद करण्याचे आदेश मस्क यांनी दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

एलॉन मस्क यांना ट्विटरची मालकीहक्क मिळाल्यानंतर लगेचच त्यांनी कंपनीतील बऱ्याचशा अधिकाऱ्यांना कामावरुन काढून टाकले. त्यामध्ये सीईओ पराग अग्रवाल यांचाही समावेश होता. याच काळामध्ये त्यांनी ट्विटरची आर्थिक स्थिती बिघडलेली असल्याचे सांगत दिवाळखोरीची कल्पना दिली. त्यानंतर या कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करण्यात आले. भारतामध्ये या नोकर कपातीचे प्रमाण ९० टक्क्यांहून जास्त होते.

Black market, pune RTO, brokers,
पुणे आरटीओत ‘काळाबाजार’! दलालांनी उभारली पर्यायी यंत्रणा; कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार
ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा

आणखी वाचा – “ट्विटर वापरण्याचा आजचा शेवटचा दिवस” एलॉन मस्कने शेअर केलेला सेक्सी फोटो पाहून नेटकरी संतापले

नुकतीच कंपनीने भारताची राजधानी नवी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई या दोन शहरांमधील कार्यालये बंद करण्यात आली. यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, अभियंत्यांना आणि अधिकाऱ्यांना घरुन वर्क फ्रॉर्म होम करण्यास सांगितले आहे. याद्वारे कंपनी पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्ली, मुंबईमधील कार्यालये बंद केली असली तरी, बंगळुरुमधील कार्यालय अजूनही सुरु आहे.

आणखी वाचा – गरोदर महिलेने ९ महिने जोरदार व्यायाम केला, ‘असं’ बाळ जन्माला आलं की.. Video पाहून म्हणाल, अशक्यच!

गुगल, मेटा, अ‍ॅपल अशा कंपन्या सध्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. पुढील काही वर्षांमध्ये भारत ही तंत्रज्ञान क्षेत्रासाठीची सर्वात मोठी बाजारपेठ बनण्याचे संकेत आहेत. त्यानुसार आपल्या देशामधील बाजारपेठांमध्ये नवनवीन कंपन्या प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्विटरची भारतामधील कार्यालये बंद करण्याच्या निर्णयावरुन एलॉन मस्क यांनी बाजारपेठेतील वृद्धीपेक्षा आर्थिक स्थिती सांभाळण्यावर भर दिल्याचे समजते. सॅन फ्रान्सिस्कोमधील मुख्यालय आणि लंडन कार्यालयाच्या जागांचे भाडे भरण्यासाठीही कंपनी अयशस्वी ठरली आहे.