Elon Musk: जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतात. आता ते चर्चेत आले तर त्यांच्या कमी झालेल्या वजनामुळे. इलॉन मस्क यांचे वजन सुमारे १३.५ किलो कमी झाले आहे. स्वत: मस्कने ट्विटरवर याचा खुलासा केला आहे.

इलॉन मस्क यांनी सांगितले की, त्यांनी आपले वजन सुमारे ३० पौंडांनी म्हणजे सुमारे १३.५ किलोने कमी केले आहे. एका ट्विटर युझरने मस्कला विचारले की, इतके वजन कमी करण्यासाठी तू काय केलेस? एलन यांनी त्याला आपल्या आहाराविषयी सांगितले. त्यांनी पुढे लिहिले की, त्यांना आता निरोगी वाटत आहे. युझरने कमेंट करत त्याचं अभिनंदनही केलं आहे, त्याचं वजन कसं कमी झालं ते जाणून घेऊया.

शिकागो नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने इलॉनची दोन छायाचित्रे पोस्ट केली ज्यात त्याचे वजन कमी झालेले परिवर्तन दिसून आले आहे.

(आणखी वाचा : अबब! ‘या’ महिलेचे पाय आहेत जगात सर्वात मोठे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड बुकमध्ये नोंद; साईज पाहून तुम्हालाही बसेल धक्का!)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इलॉन मस्क घेतात ‘या’ गोष्टींची काळजी
इलॉन मस्क यांनी सांगितले की, ते अनेक गोष्टींची काळजी घेतात. औषधांचे सेवन योग्य रित्या आणि योग्य वेळी करतात. अनेक खाद्यपदार्थ खाणेही टाळतात. ट्विटरवर आणखी एका युझरने एलनला विचारलं, “तू इतकं वजन कसं कमी केलंस?” त्याला उत्तर देताना मस्कने लिहिले की, उपवास, शुगरचं औषध आणि कोणतेही स्वादिष्ट जेवण माझ्या आयुष्यात नाही. ऑक्टोबरमध्ये मस्क यांनी इंटरमिटेंट फास्टिंग हे यामागचं रहस्य असल्याचंही म्हटलं होतं. तसेच अधूनमधून उपवास केल्याने त्यांनी नऊ किलो वजन कमी केले आहे आणि त्याला खूप निरोगी वाटत आहे, असाही मस्क यांनी खुलासा केला आहे.