मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट असा लौकिक असणाऱ्या ट्विटरने काही दिवसांपूर्वीच सगळ्या अकाऊंट्सच्या ब्लू टिक काढून टाकल्या होत्या. ट्वीटरवर ब्लू टीक मिळणं म्हणजे अकाऊंट व्हेरिफाईड असल्याची खूण. मात्र ही खूण गेल्यामुळे अनेकजण त्रासले होते. खुद्द अमिताभ बच्चन यांनीही याबाबत आपलं म्हणणं व्यक्त केलं होतं. शाहरुख खान, सलमान खान, काँग्रेस नेते राहुल गांधी या आणि अशा अनेक अकाऊंटवरून ब्लू टिक गेली होती. पण आता अनेकांनी पैसे न देताच ही ब्लू टिक परत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्या अकाऊंटवर परत आली ब्लू टिक?

आपला लाडका सचिन तेंडुलकर याच्या अकाऊंटची ब्लू टिक हटवण्यात आली होती, ही ब्लू टिक परत आली आहे. तसंच विराट कोहली आणि इतर काही महत्त्वाच्या दिग्गजांचेही ब्लू टिक परत आले आहेत. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या ट्वीटरवरही ब्लू टिक दिसू लागली आहे. नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफजाईच्या अकाऊंटवरही ब्लू टिक आली आहे. त्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला आहे. ट्विटरवर अशा अनेक सेलिब्रिटींच्या अकाऊंटवर ब्लू टिक परत आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elon musk twitter restores blue tick for celebrities legacy blue ticks for select users scj
First published on: 24-04-2023 at 16:58 IST