सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ आहे. कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर शहारा येतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. समुद्र किनाऱ्यावर पर्यटक मौजमस्ती करताना दिसत आहे. या दरम्यान एक विमान हवेत उडताना दिसत आहे. मात्र थोड्याच वेळात विमान खाली पडताना पाहून एकच खळबळ उडते. विमान जोरात समुद्रात लँड होते. लँडिंगचा करताना इतका आवाज होतो की, जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धावपळ उडते आणि आरडाओरड होतो.

oceanholic_life या पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना पोस्ट लिहिली आहे की, WWII-era प्लेनचं फ्लोरिडाच्या कोकोआ बीचवर इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नाही. विमान समुद्रात पडल्यानंतर पर्यटक इकडेतिकडे धावताना दिसत आहेत. लँडिंग केल्यानंतर विमान तरंगताना दिसत आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहे. अनेकांनी मोठी दुर्घटना टळल्याने देवाचे आभार मानले आहेत. नेटकरी हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.