रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरु आहे. अशा परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप परत आणण्याचे कामसुद्धा युद्धपातळीवर सुरु आहे. दरम्यान, भारतीयांना दिल्लीत आणणाऱ्या विमानातील वैमानिकाच्या घोषणेचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. पायलटने प्रवाशांना जे सांगितले ते हृदयस्पर्शी होते.

युक्रेनमध्ये अडकलेल्या बहुतांश भारतीयांना परत आणण्यात यश मिळाले आहे. त्यांना विशेष फ्लाइटने भारतात आणले जात आहे. बुडापेस्टहून दिल्लीसाठी उड्डाण करण्यापूर्वी स्पाइसजेटच्या वैमानिकाने प्रवाशांना जे सांगितले ते ऐकून लोक भावुक झाले. या वैनामिकाने सांगितले, “संपूर्ण स्पाइसजेट परिवाराच्या वतीने, बुडापेस्ट ते दिल्ली या विशेष विमानात आम्ही तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तुम्हा सर्वांना सुरक्षित पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्हाला तुमच्या धैर्याचा आणि दृढनिश्चयाचा अभिमान आहे. तुम्ही अनिश्चितता, अनेक अडचणी आणि भीतीवर मात करून सुरक्षितपणे येथे पोहोचला. आता आपल्या मातृभूमीकडे परत जाण्याची वेळ आली आहे. आता घरी जाण्याची वेळ आली आहे.”

Ukraine War: रशियन मांजरांच्या विदेशगमनास बंदी; ‘हे’ आहे कारण

जो बायडेन यांच्या ‘या’ गोष्टीवर एलन मस्क यांनी व्यक्त केली नाराजी; ट्विट करत दिले रोखठोक उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पायलटच्या या हृदयस्पर्शी घोषणेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला असून नेटकऱ्यांना पायलटची प्रवाशांचे स्वागत करण्याची ही शैली फारच आवडली आहे. त्याचबरोबर सर्व भारतीय लवकरात लवकर परतावेत अशी प्रार्थना लोक करत आहेत.