Viral video: या जगात आल्यावर सर्वात आधी मुली कोणत्या पुरुषाला ओळखू लागतात, त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात, ज्याच्या जीवावर जगणं, हसणं, बोलणं, चालणं सुरु करतात तो असतो त्यांचा लाडका बाबा! खरं तर असं म्हटलं जातं की मुलगी या जगात येण्याआधीपासून तिच्यावर कोणी जीव ओवाळून टाकत असेल तर ते वडिल असतात. आपल्या घरी लक्ष्मीचं आगमन व्हावं आणि तिचं स्वागत करता यावं यासाठी काही काही पुरुष तर ९ महिने डोळे लावून वाट पाहत असतात. जन्माला आल्यानंतर आई त्या बाळाचं खाणं-पिणं पाहते पण वडिल मात्र तिच्या उठण्यापासून झोपेपर्यंतच्या वेळात तिच्याकडे कौतुकाने पाहत तिची प्रत्येक गोष्ट आपुलकीने करतो. कधीतरी आपली लेक मोठी होणार आणि उंबरठा ओलांडून सासरी जाणार हे माहित असूनही आपल्या श्वासापेक्षा जास्त जपतो आणि गरजेपेक्षा अधिक देण्यात कमी पडत नाही ते वडिल असतात…

मात्र आजही समाजात अशा मानसिकतेची लोकं आहेत जी मुलींच्या जन्मानंतर नाकं मुरडतात तर मुलींच्या पालकांकडे तुच्छ नजरेनं पाहतात. अशाच एका वडिलांनी तिनीही मुलीच का? असं विचारणाऱ्या मुलींनीच जबरदस्त असं उत्तर दिलं आहे. दोन मुलींनी आपल्या लाडक्या बाबांना असं काही सरप्राईज दिलंय की पाहून वडिलांना अश्रू अनावर झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.

सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी आपल्या वडिलांना सरप्राइझ गिफ्ट देताना दिसून येते. तिने आपल्या वडिलांना एका ठिकाणी नेले. यानंत त्यांच्यासमोर एक रॉयल एनफील्ड बुलेट उभी होती. वडिलांना विश्वासत बसत नव्हाता, यावेळी त्यांनी बेटा हे काय? असं विचारलं…यावर मुलीने सांगितेल हे तुमचे सरप्राइझ गिफ्ट… वडिलांना काय करावे सूचेनासे झाले… काही न बोलता त्यांचे डोळे भरून आले आणि त्यांनी लगेच आपल्या मुलीला घट्ट मिठी मारली. वडिलांना आनंदी पाहून मुलीच्याही डोळ्यांत पाणी आले. तिनेही वडिलांना घट्ट धरले होते. मुलगी असण्याचा खरा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.

पाहा व्हिडीओ

मुलगाच हवा या हट्टामुळे आजही अनेक ठिकाणी मुलगी जन्माला की नाक मुरडला जातो. मुलगा झाला म्हणजे, लाडू आणि चमचमीत मिठाई वाटप करायची आणि मुलगी झाली तर जिलेबी… असे चित्र आजही पाहायला मिळते. अशा मानसिकतेच्या लोकांच्या डोळ्यांत अंजन घालणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ इतका सुंदर आहे, की पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळल्याशिवाय राहणार नाही.