Emotional Video: लग्न केवळ दोन व्यक्तींनाच नाही तर दोन कुटुंबाना एकत्र आणतं. लग्न करून सासरी जाणं हे कोणत्याही मुलीला थोडं जडच जातं. त्यात अजूनही हुंडा नावाची प्रथा कुठे ना कुठे सुरूच आहे. या सगळयात अनेकदा मुलीला जाच सहन करावा लागतो. तरीही स्वत: सगळा त्रास सहन करून आपल्या आई वडिलांना त्रास नको म्हणून ती सगळं सहन करते. अशा परिस्थितीत काही मुली घर सोडून जातात किंवा थेट घटस्फोट घेऊन वेगळ्या होतात. पण काही मुली त्यांच्या हक्कासाठी लढतात.

सगळं सहन करूनही सासर सोडत नाहीत. सध्या असाच काहीसा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका महिलेबरोबर नेमकं का घडलंय. जाणून घेऊ या…

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन एक महिला घराच्या उंबऱ्यावर बसलेली दिसत आहे. तिच्या आजूबाजूला थोडं सामान ठेवलेलंही दिसत आहे. तिच्या बाजूला एक पाण्याने भरलेला तांब्या दिसतोय. यावरून असा अंदाज जातंय की, सासरच्यांनी तिला घराबाहेर काढल्यामुळे घराच्या उंबऱ्यावरच राहते आहे. दरम्यान, महिला उंबऱ्यावर का बसली आहे आणि हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @made_in.marathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “मरून जाईन पण माहेरी जाणार नाही असं म्हणत उंबऱ्यावर बसून राहिली सून” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.६ मिलियन व्हयुज आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “आमची बहीण आमच्यासाठी जीव आहे. तिची किंमत त्या दारात नाही आमच्या हृदयात आहे. सासरी ताण असेल आणि इकडे आई बापाकडे येऊन नाव खराब होईल म्हणून कित्येक मुलींनी आपले जीवन संपवले आहे.” तर दुसऱ्याने “यात मुलीच्या आई वडिलांची चूक आहे. मुलीचा विचार न करता कसल्याही घरात मुली देतात, पैसेवाले घर पाहतात. पण मुलीला नांदायच असतं तुम्हाला नाही” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “एकच आयुष्य आहे अशा लोकांसाठी वाया नका घालवू”