Emotional video: सोशल मीडियावर तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडीओ पोट धरुन हसवणारे असतात काही व्हिडीओ रडवणारे असतात तर काही व्हिडीओ विचार करायला भाग पाडतात. देवाने आपल्याला निरोगी तंदुरुस्त शरीर दिले आहे, मात्र तुम्ही कधी याबद्दल आभार मानले आहेत का? आता तुम्ही म्हणाल यात काय आभार मानायचे प्रत्येकालाच हात पाय शरीर असतंच की.. पण असं नाहीये, जगात असेही काहीजण आहेत जे जगण्यासाठी रोज संघर्ष करतात. अगदी लहान वयातल्या मुलांच्यांही वाट्याला कधीकधी हे दुख: येते. अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये या चिमुकल्याला हार्ट ट्रान्सप्लांट करण्याआधी झालेला आनंद पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

या व्हिडिओमध्ये एक लहान मूल दिसत आहे. ज्याला हृदयाशी संबंधित काहीतरी आजार आहे. मुलाच्या हृदय ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यासाठी ते रुग्णालयात आले आहेत. यादरम्यान, डॉक्टर आणि नर्सला भेटल्यानंतर तो काय बोलतो हे जाणून तुम्हीही भावूक व्हाल. हा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक ६ वर्षाचा मुलगा दिसत आहे. ज्याला त्याच्या आईसोबत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलाच्या नाकाला ऑक्सिजनचे पाइप जोडलेले होते. पण तो खूपच आनंदी दिसत आहे. हा चिमुकला दवाखान्यात येताच. समोर उपस्थित नर्सला सांगतो. ‘मला नवीन हृदय मिळणार आहे’. त्यानंतर, नर्स देखील मुलाचे हे वाक्य ऐकून आश्चर्यचकित होते आणि आपला आनंद व्यक्त करते. यानंतर ती मुलासोबत थोडी मस्करी करते. यानंतर मूल दुसऱ्या वॉर्डात दाखल होते. आनंद म्हणजे नक्की काय किंवा आपण धडधाकट निरोगी आहोत यापेक्षा मोठं काहीच नाही हे हा व्हिडीओ पाहून कळतं.

हा ६ वर्षीय चिमुकला जॉन हेन्री याला हृदयविकार होता आणि त्यांचे कुटुंबीय सहा महिन्यांपासून त्याचे हृदय ट्रान्सप्लांट करण्यासाठी कोणीतरी हृदय दात्याच्या शोध घेत होते. जेव्हा कुटुंबाला हृदय दाता सापडला आणि ६ वर्षांच्या जॉन हेन्रीला याची माहिती मिळाली तेव्हा त्याचा आनंद विलक्षण झाला. हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ नर्स आणि डॉक्टरांना तो मधूनमधून सांगू लागला की त्याला नवीन हृदय मिळत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ज्वेलर्सच्या दुकानात जबरी चोरी; मिनिटांमध्ये लुटलं कोटींचं सोनं; VIDEO पाहून बसेल धक्का

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ @CleClinicKids खात्यावरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या भावूक प्रतिक्रिया देत आहेत.