Emotional Viral Video: माणसांचा स्वभावच असा आहे की, तो नेहमीच काही ना काही कारणावरून तक्रार करीत राहतो. आपल्याकडे जे आहे, त्यासाठी देवाचे आभार मानण्याऐवजी आपल्याकडे जे नाही, त्यासाठी तो रात्रंदिवस तक्रार करीत राहतो. मला हे कधी मिळेल ते कधी मिळेल, असा विचार करून तो अस्वस्थ होत राहतो. थोडक्यात माणसाचा हा हव्यास कधीच कमी होत नाही. पण, सध्या तो जे जीवन जगत आहे, ते दुसऱ्या एखाद्यासाठी स्वप्न असण्याचीही शक्यता आहे हे त्याच्या का ध्यानात येत नाही. हे जेव्हा प्रत्येक जण ध्यानात घेऊ लागेल तेव्हा प्रत्येकाच्याच आयुष्यात दररोज सुखाची सुंदर सकाळ उगवताना दिसेल. हे फारच भावनिक आणि स्वप्नवत होतंय नाही का? पण सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असणाऱ्या व्हिडीओबद्दल ते म्हणायचेय.

सध्या इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर आपण भावनिक होणे स्वाभाविक आहे. अशा काळात जेव्हा लोकांना एसीमध्ये आराम वाटत नाही, तेव्हा एका कुटुंबाने घरात पंखा आल्याने आनंद साजरा केला. घरात पहिल्यांदाच सिलिंग फॅन आला तेव्हा संपूर्ण कुटुंबाने ज्या प्रकारे आनंद साजरा केला आणि त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य अगदी हेवा वाटण्यासारखे होते.

पंखा ही आजकाल बहुतेक सर्वांच्या दृष्टीने सामान्य बाब आहे. पण, आता घरात पंखा आल्यानेही एखादे कुटुंब आनंद साजरा करू शकते ही तशी दुर्मीळच बाब नाही का? अशाच आनंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हृदयस्पर्शी व्हिडीओमध्ये एक महिला हातात पंख्याची मोटार घेऊन उभी असल्याचे दाखवले आहे आणि दुसरी महिला त्या पंख्याचे स्वागत करताना टिळा लावत आहे. हा टिळा लावल्यानंतर ती त्यावर ‘माऊली’ (संरक्षणासाठी बांधलेला धागा) बांधते.

तिच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून तुमचेही भरून येतील डोळे

पंख्यावर टिळा लावल्यानंतर ती घरातील सर्व सदस्यांना टिळा लावते आणि ‘माऊली’ बांधते. शेवटी एका महिला पंख्याखाली उभी असल्याचे दाखवले आहे. तिच्या चेहऱ्यावरील हास्यावरून घरात पंख्यासोबत ती किती आनंदी आहे हे स्पष्ट होते.

विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमुळे वापरकर्ते भावनिक झाले आहेत. व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये वापरकर्त्यांनी भावनिक प्रतिक्रिया स्पष्टपणे व्यक्त केल्या आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका वापरकर्त्याने लिहिले, “हा माझा हिंदुस्थान आहे, जो थोड्याशा परिस्थितीतही आनंदाने पुढे जात आहे.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिलेय, “कष्टाच्या हवेत जो आराम मिळतो, तो इतर कोणत्याही गोष्टीत मिळत नाही. देव तुमचे प्रेम आणि कौटुंबिक एकता कायम ठेवो.”

येथे पाहा व्हिडीओ

तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा. देव तुमच्या कुटुंबाला नेहमीच पुढे जाण्यास मदत करो.” दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले, “ही आपली संस्कृती आहे, जिथे आजही घरात काही नवीन आले की, टिळा लावून त्याचे स्वागत केले जाते. देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो.”