एखादी गोष्ट नीट करणं आपल्याला शक्य नसलं की त्यावेळी डोक्याला फार त्रास वगैरे न देता त्यातून सोयीचा मार्ग काढण्याची आपल्याला जणू सवयच झालीय. तेव्हा असा ‘जुगाड’ करण्यात आपला हात कोणी धरू शकत नाही. आता बिहारच्या सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या बिचाऱ्या कर्मचाऱ्यांचंच घ्या ना! कार्यालयाचं छत गळतंय, बरं ही परिस्थिती एवढी वाईट की इथे कधीही छताचा भाग कोसळून डोक्यावर पडू शकतो. मात्र याची तक्रार करून काही उपयोग नाही अशी चिन्हं दिसू लागल्यावर इथल्या कर्मचाऱ्यांनी यातून स्वत:च मार्ग काढलाय. या कार्यालयातील कर्मचारी चक्क हेल्मेट घालूनच काम करतात. छतावरून सारखं पाणी गळतं आणि हेल्मेटमुळे डोकं भिजत नाही आणि दुसरं म्हणजे छत कोसळलं तर निदान डोकं तरी वाचेल असं म्हणून हे कर्मचारी हेल्मेट घालून बसतात.
VIRAL VIDEO: ‘विंचू चावला’वर औरंगाबादच्या महापौरांचा डान्स
‘नेटवर्क १८’ ने दिलेल्या वृत्तानुसार बिहारच्या चंपारण जिल्ह्यात हे कार्यालय आहे. इथले कर्मचारीच नाही तर कामासाठी येणारे सामान्य नागरिक देखील हेल्मेट घालून येतात असं इथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. इथले अनेक कर्मचारी याआधी डोक्यावर छत कोसळून जखमी झाले होते. मात्र तरीही येथील प्रशासन या विषयाकडे लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. तेव्हा कार्यालयाची दुरुस्ती होईल तेव्हा होईल पण तुर्तास तरी या कर्मचाऱ्यांनी शक्कल लढवून आपल्या सुरक्षेचा उपाय स्वत:च शोधून काढला आहे.
Viral Video : रस्त्यात कचरा केल्याने दुकानदाराने संरक्षणमंत्र्यांचा भररस्त्यात केला ‘कचरा’