English Fan’s Sings Hindi Song At Rajkot Stadium:  बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. फक्त देशातच नाही तर जगभरात त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. आजही वयाच्या ५८ व्या वर्षी शाहरुख खान बॉलीवूडमधील फिट आणि हँडसम दिसणाऱ्या अभिनेत्यांना टक्कर देतो. यामुळे जगभरातील करोडो लोक शाहरुखच्या फॅशनचे, अभिनयाचे दिवाने आहेत. शाहरुखविषयी चाहत्यांमध्ये असलेले हे वेड अनेकदा पाहायला मिळते. अशात एका परदेशी चाहत्याने भर स्टेडियममध्ये शाहरुखचे एका खास गाणं अनोख्या पद्धतीने सादर करत प्रेक्षकांना एक वेगळा आनंद दिला.

शाहरुखने आजवर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले, यातील अनेक चित्रपट आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. यातीलच एक चित्रपट म्हणजे “कल हो ना हो.” याच चित्रपटातील “कल हो ना हो” गाण्यातील धून अनेक लोकांची ऑल टाईम फेव्हरेट आहे. दरम्यान, राजकोटमध्ये रंगलेल्या IND vs ENG च्या सामन्यादरम्यान भरस्टेडियममध्ये एका विदेशी चाहत्याने ट्रम्पेट या वाद्यावर ‘कल हो ना हो’ची सुंदर धून वाजवत प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले. यातून त्याने बॉलीवूड सुपरस्टारबद्दल आपले प्रेम आणि कौतुक व्यक्त केले.

Wakad Police Arrest 10 for IPL Betting Extortion through Betting
पिंपरी : आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग; दहा जण अटकेत
Virat Kohli
सातत्यपूर्ण कामगिरीचा बंगळूरु, कोलकाताचा प्रयत्न; ‘आयपीएल’मध्ये आज आमनेसामने
IPL 2024 Gujarat Titans vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024 GT vs MI: “मुंबईचा राजा…” अहमदाबादमध्ये रोहित शर्माच्या चाहत्यांनी केलं हार्दिक पांड्याला ट्रोल, VIDEO व्हायरल
Why is Smriti Mandhanas success in WPL important for Indian cricket
विश्लेषण : स्मृती मनधानाचे ‘डब्ल्यूपीएल’मधील यश भारतीय क्रिकेटसाठी का महत्त्वाचे?

…अन् मुंबईतील सिग्नल यंत्रणेवर दिसू लागले चक्क मराठी आकडे; पाहा VIDEO

परदेशी चाहता ट्रम्पेटवर जेव्हा “कल हो ना हो” हे आयकॉनिक गाणं वाजवत होता, तेव्हा स्टेडियममधील उपस्थित प्रेक्षकही त्याला टाळ्या वाजवून प्रोत्साहन देताना दिसले; तर अनेक जण त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करत गाण्यावर थिरकताना दिसले. त्याने वाजवलेल्या या सुंदर धूनमुळे स्टेडियमवरही एक वेगळा माहोल तयार झाला होता. केवळ भारतीयच नाही तर इतर परदेशी क्रिकेट चाहतेही या धूनचा आनंद घेत होते. त्या व्यक्तीने ही धून जशी वाजवण्यास सुरुवात केली, तशी उपस्थित लोकांच्या चेहऱ्यावर आपसूकच एक स्मितहास्य उमलून आल्याचे दिसले. अनेकांनी ओरडून, टाळ्या, शिट्ट्या वाजवून त्याला साथ दिली. या विदेशी चाहत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.