सोशल मीडियावर कधी कधी असे व्हिडीओ पाहायला मिळतात की, जे पाहून हसू आवरता येत नाही. सध्या असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यात एक तरुण भुंकण्याच्या स्पर्धेत कुत्र्याला टफ फाइट देताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या तरुणाने भुंकण्याच्या स्पर्धेत चक्क कुत्र्याला हरवले आहे. त्यामुळे तरुणाची भुंकण्याची ही कला पाहून अनेकांनाच धक्का बसला आहे.
भुंकण्याच्या स्पर्धेत कुत्र्याला दिली टफ फाइट
व्हिडीओत एक तरुण जर्मन शेफर्ड कुत्र्याशी भुंकण्याची स्पर्धा करीत आहे. व्हिडीओत पुढे दिसतेय की, एक तरुण खुर्चीवर बसला होता आणि तेवढ्यात एक कुत्रा त्याच्याजवळ येऊन त्याच्यावर जोरजोरात भुंकू लागतो. त्यानंतर तरुणही कुत्र्याच्या अंगावर भुंकतो. मग तो तरुण खुर्चीच्या बाजूला उभा राहतो आणि पुन्हा कुत्र्यावर भुंकू लागतो. अशा प्रकारे दोघांमध्ये काही मिनिटे भुंकण्याची स्पर्धा रंगते.
कुत्र्याला भुंकण्यासाठी भडकवतो तरुण
यावेळी कुत्रा थोडा वेळ भुंकतो आणि स्वत:च शांत होतो. त्यावर तो तरुण पुन्हा त्याला (कुत्र्याला) भडकवतो. त्यानंतर एक तरुण दोघांमध्ये येतो आणि रेफ्री बनतो. अशा प्रकारे दोघांमध्ये भुंकण्याची स्पर्धा सुरू होते. त्यानंतर काही काळ दोघांमध्ये स्पर्धा सुरू राहते; पण कुत्र्या काही वेळाने स्वत:च शांत होतो आणि तो तरुण स्पर्धा जिंकतो. मग तो तरुण आपला आनंदही व्यक्त करतो.
कोण आहे हा तरुण?
हा व्हिडीओ आतापर्यंत साडेपाच लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओवर युजर्स त्यांच्या मजेशीर प्रतिक्रियाही देत आहेत. एका युजरने लिहिले की, कुत्रा घाबरला. कोणता प्राणी आला आहे? त्याच वेळी इतर युजर्सदेखील विविध कमेंट्स लिहीत आहेत.
डॅरेन जेसन वॅटकिन्स ज्युनियर असे या तरुणाचे नाव असून, तो सोशल मीडियावर स्पीड नावाने प्रसिद्ध आहे. सध्या स्पीड भारतात आला आहे. मूळचा अमेरिकन असलेला स्पीड सोशल मीडियावर रोज असे प्रकार करताना दिसतो.