Extramarital Affair video: गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधांमध्ये वाढ झाली आहे. सगळ्यात महत्त्वाचे आधुनिक आणि टेक्नॉलॉजीचा जमात असल्याने अनैतिक संबंधांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहून तळ मस्तकातील आग डोक्यात जाते. प्रेम आणि विश्वासचा असा बळी जाताना पाहून नात्याचं महत्त्व कमी होतं चाललं आहे का असा प्रश्न पडतो. अशाच एका पुरुषाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये एका महिलेनं नवऱ्याला भर चौकात चक्क चपलेने त्याची धुलाई केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
यूपीच्या बरेली जिल्ह्यात शहरातील सर्वात वर्दळीच्या भागात असलेल्या सीडीओ बंगल्यासमोर एका महिलेने तिच्या पतीला चप्पलने मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेने मारहाण करताना तिच्या पतीला शिवीगाळही केली. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचे लग्न होऊन दहा वर्षे झाली आहेत. पण आता तिचा पती दुसऱ्या महिलेसोबत राहत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.तिच्या पतीवर विश्वासघाताचा आरोप करत तिने म्हटले, “दुसरी औरत राख ली इस्ने”, असे ती महिला म्हणत असल्याचे ऐकू येते. ज्याचा साधारण अर्थ “आता तो दुसऱ्या महिलेसोबत आहे.” असा होतो.
या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर देखील शेअर केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील भडकले आहेत. त्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करत आहेत. युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं. पण एखाद्याने विश्वासघात केल्यास त्याचे परिणाम गंभीर होतात. अनेकजण आपलं लग्न झाल्यानंतरही दुसऱ्या व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवत असतात. तर सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला
पाहा व्हिडीओ
बरेली पोलिसांनीही व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.”प्रभारी निरीक्षक कोतवालीला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आणि नियमांनुसार आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,” असे पोलिसांनी एक्स प्लॅटफॉर्मवर सांगितले.महिलेने तिच्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे आणि तिला न्याय मिळावा अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.