Man Killed Wife For Refusing Sex: दिल्लीमध्ये भररस्त्यात अल्पवयीन तरुणीची चाकूने भोसकून हत्या केल्याचे प्रकरण चर्चेत असताना आता हैदराबादमधील एका हत्येची घटना उघड झाली आहे. हैदराबाद मध्ये एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने खून केल्याप्रकरणी या व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० मे रोजी घडली होती, परंतु १० दिवसांनंतर त्या व्यक्तीने आपला गुन्हा कबूल केला. वयाच्या तिशीत असलेल्या या व्यक्तीने त्याच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु तिने नकार दिल्याने रागाच्या भारत त्याने तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

या हत्येच्या तपासात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सदर व्यक्तीच्या पत्नीने अवघ्या एका महिन्यापूर्वी दुसऱ्या बाळाला जन्म दिला होता, हत्येनंतर आरोपीने त्याच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली होती. महिलेला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, महिलेच्या मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी तक्रार दाखल केली होती.

हे ही वाचा<< टिपू सुलतानच्या चित्रासमोर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नतमस्तक? Viral फोटोवर नेटकऱ्यांचा संताप पण मुळात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सैदाबाद पोलिस स्टेशनच्या एका पोलिस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितल्यानुसार, प्राथमिक तपासादरम्यान, महिलेच्या गळ्यावर नखांच्या काही खुणा आढळून आल्या. त्यानंतर आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. शवविच्छेदन अहवालातही मृत्यूच्या कारणाची पुष्टी झाली, त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.