अंकिता देशकर

CM Yogi Adityanath Bows Down In Front Of Tipu Sultan: लाईटहाऊस जर्नालिज्मला एक फोटो सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेला समोर आला. या फोटोमध्ये यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे म्हैसूर राज्याचे वादातीत सम्राट टिपू सुलतान यांच्या पोर्ट्रेटसमोर नतमस्तक होताना दिसत आहेत. या फोटोवरून सोशल मीडियावर नेटकरी प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. मात्र याचे सत्य काहीतरी भलतेच असल्याची सुद्धा चर्चा आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया…

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर IrAm ने व्हायरल फोटो शेअर करत लिहले: “ज्यांचे आज मुस्लिमांशी वैर आहे ते सुद्धा आमच्या पूर्वजांसमोर नतमस्तक होत आहे.”

बाकी यूजर्स देखील हे फोटो शेअर करताना दिसत आहेत.

तपास:

आम्ही फोटोवर गुगल रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला. आम्हाला upviral24.in वर प्रकाशित झालेला एक लेख मिळाला, त्या आर्टिकल मध्ये आम्हाला यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मिळते जुळते बॅकग्राउंड असलेला फोटो सापडला. पण त्यात योगी आदित्यनाथ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पांजली अर्पण करत होते.

आम्हाला त्याच कार्यक्रमातील एक फोटो indiablooms.com वर आढळला. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती राम नाथ कोविंद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसमोर नतमस्तक झाले होते, असे सांगणारा हा लेख २९ जून २०२१ रोजी अपलोड केला होता.

कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “राष्ट्रपती राम नाथ कोविंद मंगळवारी लखनऊ येथील लोक भवन येथे डॉ भीमराव आंबेडकर स्मारक आणि सांस्कृतिक केंद्राच्या पायाभरणीवेळी डॉ भीमराव आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहत आहेत”. २९ जून २०२१ रोजी योगी आदित्यनाथ यांच्या फेसबुक पेजवर असाच फोटो आढळून आला.

गूगल कीवर्ड सर्च वापरून, आम्ही कार्यक्रमातील अधिक फोटो शोधले. आम्हाला स्टॉक इमेजस वेबसाइटवर वर असाच एक फोटो आढळून आला.

कॅप्शन मध्ये लिहले होते: लखनऊ, भारत. २९ जून, २०२१ . मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री योगी बेन पटेल यांच्या उपस्थितीत डॉ भीमराव आंबेडकर स्मारक आणि सांस्कृतिक केंद्राच्या पायाभरणी समारंभात डॉ भीमराव आंबेडकर यांना पुष्पांजली वाहिली. आदित्यनाथ, लखनऊ, भारत येथे २९ जून २०२१ रोजी लोक भवन येथे. (दीपक गुप्ता/हिंदुस्तान टाइम्स/सिपा यूएसएचे छायाचित्र) क्रेडिट: सिपा यूएसए/एलेमी लाइव्ह न्यूज.

हे ही वाचा<< “सचिन तू तेव्हा नाक खुपसू नको म्हणालास, आता CBI मुळे..” कुस्तीपटूंच्या आंदोलनावरून तेंडुलकरच्या घराबाहेर काँग्रेसचे बॅनर

निष्कर्षः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ टिपू सुलतानच्या फोटोपुढे नतमस्तक झालेले नाहीत तर व्हायरल फोटो डिजिटली एडिट केलेला आहे. तर मूळ फोटोमध्ये २०२१ मध्ये लखनऊ मध्ये डॉ भीमराव आंबेडकर स्मारक आणि सांस्कृतिक केंद्राच्या पायाभरणीच्या वेळी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहत होते.

Story img Loader