Facial Hair Remove Shocking Jugaad Video : सोशल मीडियावर मेकअप टिप्स, ट्रिक्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात अनेकदा मेकअप एक्स्पर्ट किंवा पार्लर शिकलेल्या महिला, तरुणी हेअर स्टाईल, मेकअप, क्लिनअप, फेशियल ते फेस हेअर रिव्हूच्या सोप्या टिप्स, ट्रिक्स सांगत असतात. यावेळी त्या काही जुगाडदेखील सांगतात, जो अनेकदा खरचं प्रभावी असतो. पण, काही जुगाड इतके धोकादायक असतात की करणं दूर, पाहतानाही भीती वाटते. सध्या अशाच एका पार्लरवाल्या ताईचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात तिने घरच्या घरी चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी असा काही जुगाड केला आहे की, पाहून तुमचे डोळे भिरभिरतील. अनेकांनी हा जीवघेणा प्रकार असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पार्लरवाल्या ताईचा जीवघेणा जुगाड

पार्लरमध्ये चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी वॅक्सिंग किंवा थ्रेडिंग केलं जातं किंवा काही क्रीम्सचीदेखील मदत घेतली जाते. पण, व्हिडीओत एक पार्लरवाली ताई ते काहीच न करता असा काही जीवघेणा प्रयोग करतेय की पाहून तुम्हालाही भीती वाटेल.

व्हिडीओत पाहू शकता, एक पार्लरवाली ताई क्लायंटच्या चेहऱ्यावरील केस काढताना दिसत आहे. यासाठी ती वॅक्सिंग किंवा थ्रेडिंग वापरत नाही तर ती चक्क एक माचीसची काडी पेटवते आणि नंतर ती पेटती काडी क्लायंटच्या गालाजवळून हळूहळू फिरवते, जेणेकरून तिच्या गालावर केस जळतील. पण, असं करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

हा धक्कादायक व्हिडीओ beauty.queen.artist नावाच्या एका युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, जो आत्तापर्यंत अनेकांनी पाहिला आणि त्यावर वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या. अनेकांनी पार्लरवाल्या ताईला असा धोकादायक प्रयोग केल्याबद्दल जोरदार ट्रोल केलं, तर काहींनी हा जुगाड खरंच धक्कादायक असल्याचे म्हणत आश्चर्य व्यक्त केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने म्हटले की, “लेजर हेअर रिमूव्हल ट्रीटमेंट आता महाग राहिलेली नाही.” दुसऱ्या युजरने म्हटले की, “ग्राहकाला हे करून घेण्याची हिंमत कुठून येते? मला हे पाहूनच भीती वाटतेय, लोक काहीही करतात.” तिसऱ्या युजरने म्हटले की, “जर हे कपड्यांवर किंवा त्वचेवर पडले तर काय होऊ शकते, याचा तुम्ही विचार केला आहे का?”