Mosque Set on Fire Fact Check Video: सोशल मीडियावर अनेक मेसेज, फोटो, व्हिडीओ हे सातत्याने येत असतात. मात्र यातील अनेक गोष्टी या फेक असतात. त्यामुळे चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचतो. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. तो व्हिडीओ फेक आहे की, त्यात काही सत्यता हे आज आपण जाणून घेणार आहोत.
भारतातील भीषण अपघात अन् आगीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत; ज्याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहेत. अशात लाइटहाऊस जर्नलिझमलाही सोशल मीडियावर एका आगीच्या दुर्घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असल्याचे आढळून आले. या व्हिडीओमध्ये दावा करण्यात आला आहे की, एका मशिदीला आग लावण्यात आली आहे. व्हिडीओसोबत असा दावा केला जात होता की, बजरंग दलाच्या सदस्यांनी एका मशिदीला आग लावल्याचे दाखवले आहे. पण, मशिदीला खरंच आग लागली काय? हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, याबाबतचे सत्य जाणून घेऊ…
दावा काय आहे?
इन्स्टाग्राम वापरकर्ता x__bipin__07 ने खोट्या दाव्यासह त्याच्या प्रोफाइलवर व्हिडीओ शेअर केला आहे.

इतर वापरकर्तेदेखील त्याच दाव्यासह व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपासादरम्यान आम्हाला व्हायरल झालेला दावा खोटा असल्याचे आढळले. व्हिडीओमध्ये उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील एका लग्नाच्या सभागृहाला लागलेली आग दाखवण्यात आली आहे.
तपास :
व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही तपास सुरू केला. आम्ही व्हिडीओमधील मजकुराचा भाग क्रॉप केला.
त्या क्रॉप केलेल्या मजकुराच्या भागाने आम्हाला तीन आठवड्यांपूर्वी YouTube वर पोस्ट केलेल्या व्हिडीओपर्यंत नेले. वापरकर्त्याने लिहिले होते की, गाझियाबादच्या राज नगर एक्स्टेंशनमध्ये मोठी आग लागली होती.
आम्हाला तीन आठवड्यांपूर्वी पोस्ट केलेले असेच काही व्हिडीओ सापडले.
आम्हाला हा व्हिडीओ रिअल गाझियाबाद आणि अपना गाझियाबाद या इन्स्टाग्राम अकाउंटवरदेखील सापडला.

आम्हाला आगीबद्दल काही अहवालदेखील आढळले.
या अहवालांमध्ये असे म्हटले आहे की, गुरुवारी दुपारी उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील एका लग्नाच्या सभागृहात मोठी आग लागली. शहरातील राजनगर विस्तारात हा विवाह सोहळा आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. वरिष्ठ अधिकारीदेखील आग लागलेल्या ठिकाणी पोहोचले आहेत. सध्या अग्निशमन दलाचे काम सुरू आहे.
निष्कर्ष : गाझियाबादमधील एका लग्नाच्या सभागृहात लागलेल्या मोठ्या आगीचा एक जुना व्हिडीओ बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून मशिदीला आग लावल्याच्या दाव्यासह शेअर केला जात आहे. हा दावा खोटा आहे.