Fact Check Jammu Floods Viral Video : ‘लाइटहाउस जर्नालिझम’ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जाणारा एक व्हिडीओ आढळला. या फुटेजमध्ये काही घरं पुराच्या पाण्यात वाहून जाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ जम्मूचा असल्याच्या दावा करून वारंवार शेअर केला जातो आहे. पण, तपासणीदरम्यान आम्हाला आढळलं की, हा व्हिडीओ भारताचा नसून युरोपमधील नॉर्वेचा आहे.
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर डॉक्टर कमलेश शर्मा यांनी हा व्हिडीओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केला आहे आणि ‘तुम्ही कधी डोंगर हलताना पाहिला आहे का? हे दृश्य जम्मूचं आहे’ अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे.
इतर युजर्सही असाच दावा करून हा व्हिडीओ शेअर करीत आहेत.
https://www.facebook.com/HajipurLive/videos/1501659594512798
तपास:
आम्ही व्हिडीओमधील स्क्रीनशॉट्स काढून, त्यांची रिव्हर्स इमेज सर्च करून तपासणी सुरू केली.
व्हिज्युअल मॅच सेक्शनमध्ये असे सूचित केले की, हा व्हिडीओ नॉर्वेजियन भूस्खलनाचा आहे.
आम्हाला १ मे रोजी फेसबुकवर अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये असेच काहीसे व्हिज्युअल्स सापडले.
कॅप्शनमध्ये लिहिले होते… #Norway नॉर्वेमधील भूस्खलन, ज्यात घरांसहित जमिनीचा एक भाग वाहून गेला.
https://www.facebook.com/watch/?v=666551626161630
आम्हाला हा व्हिडीओ ‘एक्स’ (ट्विटर)वरही अपलोड केलेला आढळला.
त्यानंतर आम्ही गूगल सर्च इंजिनवर कीवर्ड सर्च केला आणि आढळले की, ही घटना २०२० मध्ये घडली होती.
आम्हाला हा व्हिडीओ ‘द टेलिग्राफ’ने पाच वर्षांपूर्वी यूट्यूबवर पोस्ट केलेला आढळला.
असाच एक व्हिडीओ ‘एनबीसी न्यूज’ने अपलोड केला होता.
त्यांनी कॅप्शनमध्ये म्हंटले होते की, नॉर्वेच्या उत्तरेकडील समुद्रकिनाऱ्याला मोठे भूस्खलन झाले. या भूस्खलनामुळे जवळजवळ ८०० यार्ड (म्हणजे खूप लांब भाग) किनारा तुटून समुद्रात गेला. त्यात आठ घरंही थेट समुद्रात वाहून गेली.
निष्कर्ष – भूस्खलनामुळे वाहून गेलेल्या घरांचा नॉर्वेमधील जुना व्हिडीओ आता जम्मूतील पुराचा व्हिडीओ म्हणून शेअर केला जात आहे. त्यामुळे व्हायरल होत असलेला दावा दिशाभूल करणारा आहे.