Fact Check Viral Video Woman Dancing After Bail : लाइटहाऊस जर्नलिझमला एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर होताना आढळला. या व्हिडीओमध्ये एक महिला पोलिसांसमोर नाचताना दिसत आहे. जामीन मिळाल्यानंतर पोलिस ठाण्याच्या बाहेर एक महिला नागिन डान्स करताना दिसत आहे, असा दावा केला जात असून ही घटना उत्तर प्रदेशातील असल्याचे म्हटले जात होते. तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ प्रत्यक्षात एका चित्रपटातील दृश्य आहे. त्यामुळे व्हायरल झालेला दावा खोटा आहे.

काय होत आहे व्हायरल?

इन्स्टाग्राम युजर @anokhelalv अनिलकुमार विश्वकर्माने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे.

Movie scene falsely shared as real video of woman dancing after bail

इतर युजर्सदेखील हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइल्सवर त्या दाव्यासह शेअर करीत आहेत.

तपास…

आम्ही एका पोस्टच्या कमेंट सेक्शनची तपासणी केली. एका युजरने हा व्हिडीओ चित्रपटातील शूटिंगदरम्यान असल्याचे नमूद केले होते.

व्हिडीओ बारकाईने पाहिल्यास, आम्हाला त्यात कॅमेरे दिसले.

मजकूर वगळून स्क्रीनशॉटवर रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर आम्हाला रिंगकाज यदुवंशी यांच्या एका इन्स्टाग्राम रीलकडे नेले. त्यांनी ही रील ‘officialsushantsingh’ या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केली होती.

आम्हाला बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी पोस्ट केलेली रील आढळली. कॅप्शननुसार, हे ‘एक चतुर नार’ नावाच्या चित्रपटाचे बीटीएस (पडद्यामागील) दृश्य होते.

आम्हाला या चित्रपटाबद्दलचीही माहिती मिळाली.

https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/ek-chatur-naar-trailer-neil-nitin-mukesh-and-divya-khossla-lead-comedy-thriller-watch/articleshow/123497181.cms

निष्कर्ष : ‘एक चतुर नार’ चित्रपटाच्या शूटिंगमधील पडद्यामागील (BTS) हा क्षण उत्तर प्रदेशातील एका महिलेनं जामीन मिळाल्यानंतर नागिन डान्स केला आहे, असं सांगून सध्याची खरी घटना म्हणून शेअर केला जात आहे. त्यामुळे व्हायरल झालेला हा दावा खोटा आहे.