Fact check of a Man stealing electricity viral video: वीजचोरी करण्याचं प्रमाण सध्या सगळीकडेच मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. हल्ली सर्रास वीजेची चोरी केली जाते. कोणालाही शासनाचं भय उरलं नाही. अशा परिस्थितीत लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झालेला दिसला, ज्यामध्ये वीजचोरी करणारा एक माणूस वीज विभागाच्या अधिकाऱ्यांचा विरोध करताना दिसत होता. ही घटना भारतातील असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हा व्हिडीओ जातीय दृष्टिकोनातून शेअर केला जात होता. तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ भारताचा नसून पाकिस्तानचा आहे.

काय होत आहे व्हायरल? (Viral video of a Man stealing electricity)

X युजर जितेंद्र प्रताप सिंगने त्याच्या प्रोफाईलवर व्हायरल दाव्यासह व्हिडीओ शेअर केला आहे.

या पोस्टचा आर्काइव्ह व्हर्जन बघा.

https://archive.ph/WR4zk

इतर वापरकर्तेदेखील असाच दावा करत व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही व्हिडीओवरून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च करून आमचा तपास सुरू केला.

आम्हाला गुलिस्तान-ए-जोहर, कराची येथे अपलोड केलेला व्हिडीओ सापडला. ३० जून २०२१ रोजी हा व्हिडीओ जुना असल्याचा सांगून अपलोड करण्यात आला होता.

https://www.facebook.com/watch/?v=2939636232946495

आम्हाला ट्रेंड्स पाकिस्तानच्या सोशल मीडिया हँडलवर २०२० मध्ये X वर अपलोड केलेला व्हिडीओदेखील सापडला.

आम्हाला इतर अनेक प्लॅटफॉर्मवर व्हिडीओदेखील सापडला, ज्यामध्ये असे सूचित होते की व्हिडीओ कराची, पाकिस्तानचा आहे.

हेही वाचा… भारत की पाकिस्तान? शिक्षकाचे विद्यार्थ्यावर अत्याचार, छतावर उलट लटकवलं अन्…; VIRAL VIDEO नेमका आहे कुठला? पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष: २०२० चा वीजचोरीचा भांडणाचा व्हायरल झालेला जुना व्हिडीओ भारताचा नसून पाकिस्तानचा आहे. व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.