सगळ्या प्रकारची फळं खाल्ली पाहिजेत असं म्हणत अनेक जण दररोज फळांचा आहारात समावेश करतात. आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा विचार करत असलो तरी त्याची दुसरी बाजू गंभीर आहे. सध्या बनावटीचा प्रकार खूप वाढत चालला आहे. अनेक पदार्थांमध्ये बनावट केली जाते. अनेक ठिकाणी दुधात भेसळ तर होतेच, पण आजकाल तर काही भाज्या, फळेही आरोग्यासाठी धोकादायक ठरू लागले आहेत, असा दावा करणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही कलिंगड घेताना १०० वेळा विचार कराल हे नक्की…

सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहून अनेकदा आपल्याला आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात कलिंगड बनावट असल्याचं दिसून येतंय. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊ या…

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक व्यक्ती कलिंगडचं चक्क साल काढताना दिसतोय. कलिंगडचं हे साल अगदी सहजपणे काढलं जात असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय. तुम्ही विकत घेत असलेलं कलिंगड प्लास्टिकपासून बनवलं असू शकतं असा संशय या व्हिडीओमध्ये व्यक्त केला जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @punepulse या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “कलिंगड खाताना काळजी घ्या! तुम्ही विकत घेत असलेलं कलिंगड प्लास्टिकचे असू शकते” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला ३४ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, पण मी तर आतील भाग खातो. तर दुसऱ्याने “द्राक्ष नका खाऊ, पनीर नका खाऊ, कलिंगड नका खाऊ, अरे चाललंय काय… ” अशी कमेंट केली; तर एकाने कमेंट करत लिहिलं, “रात्रभर कलिंगड फ्रीजरमध्ये ठेवल्यास असे होते.”