Viral video: शेतात पाणी, घरात आणि वस्तीतही पाणीच पाणी. या पावसाने बळीराजाच्या डोळ्यात देखील पाणी आणलं. जिथे माणस पुरापासून स्वत:चा जीव वाचविण्यासाठी धडपडत आहे. तिथे हा बळीराजा स्वत:च्या जीवाची पर्वा न करता बैलाला वाचवण्यासाठी मृत्यूशी खेळतोय.या पुरामुळे बळीराजाची स्थिती हवालदिल झाली आहे. विदर्भात पावसामुळे अनेक नदी, नाले आणि ओढ्यांचे पाणी वाहत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं असून एकाठिकाणी चक्क बैलच पाण्यात वाहून गेल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. यावेळी शेतकऱ्यानं आपल्या जीवाची बाजी लावत पुराच्या पाण्या बैलाला वाचवण्यासाठी उडी घेतली. यानंतर शेवटी काय झालं तुम्हीच पाहा.
शेतकऱ्याचा सखा म्हणजे बैल. पोटच्या मुलाप्रमाणे शेतकरी बैलाला जीव लावत असतो. कुटुंबातील सदस्यांनी लावलेला लळा, माया, ममता, वात्सल्य अनेकदा अनुभवास आलेले आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नदीला पूर आला आहे आणि पुराचं पाणी गावातून वाहत आहे. अशातच एका शेतकऱ्याचा बैलही या पुराच्या पाण्यात वाहून गेला. हे शेतकऱ्याला कळताच, शेतकऱ्यानं कशाचाही विचार न करता थेट पुराच्या पाण्यात उडी घेतली. पाण्याचा प्रचंड वेग होता शेतकरी स्व:त त्या पाण्यात वाहून जाण्याची शक्यता होती मात्र तरीही शेतकऱ्यानं स्वत:च्या जीवाची पर्वा न करता बैलाला वाचवण्याचं धाडस केलं. शेवटी बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर बैलाला वाचवण्यात शेतकऱ्याला यश आलं. यावेळी बैलालाही सुखरूप पुराच्या पाण्याबाहेर काढलं आणि स्वत: शेतकरीही पाण्याबाहेर आला. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल शेवटी शेतकऱ्याचं काळीज..
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ashokdanoda नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत शेतकऱ्याचं कौतुक करत आहेत. एकानं म्हंटलंय की, “शेवटी शेतकऱ्याचं काळीज आहे जीवापेक्षा आपल्या प्राण्यांना आणि पिकांना जास्त जपतो तो..” तर आणखी एकानं, “एवढं निस्वार्थ प्रेम कुठेच पाहायला मिळणार नाही” अशी प्रतिक्रिया दिली आहे.