Viral Video Farmer Jugaad : शेतकऱ्याला शेती करून कर्ज फेडणे, लेकरांची लग्नं आदी कामांतून संसाराचा गाडा चालवायचा असतो. कधी कधी बँकादेखील कर्ज देत नाहीत. मग अनेक शेतकरी सावकारी कर्जाच्या विळख्यात सापडल्याचे बघायला मिळते. अशा अनेक समस्यांमुळे शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे पाहायला मिळते. पण, या चिंतेचं निराकरण करण्याच्या दृष्टीने शेतकरी शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन प्रयोगही करून पाहत असतो. अशाच एका महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
@Vinod Narsale या फेसबुक युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तरुण शेतकरी दत्ता सोनसाळे हा बीडच्या गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील रहिवासी आहे. शेतकऱ्याने शेतमजुरीची बचत करत एक जुगाड करून दाखवला आहे. शेतात बैलजोडी घेऊन जाणाऱ्या औतावर शेतकऱ्याने फवारा बसवून घेतला आहे. जेणेकरून एकाच वेळी कापसाच्या पिकाची पाळी आणि फवारणी ही कामे एकत्र करता येईल. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा शेतकऱ्याचा अनोखा जुगाड एकदा बघाच…
विनोद नरसाळे यांनी हा व्हिडीओ शेअर करून, शेतकऱ्याच्या युक्तीचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, की, शेतकरी म्हणजे जिद्दी, शहाणा आणि जुगाडाचा बादशहा! तरुण शेतकरी दत्ता सोनसाळे याने शेतमजुरीच्या बचतीचा एक जुगाड करून दाखवला आहे. बैलपाळीच्या औतावरच फवारा बसवून एकाच वेळी कापसाला पाळी आणि फवारणी, अशी दोन्ही कामे एकत्र केली आहेत. या जुगाडामुळे फवारणीसाठी लागणारी मजुरी आणि वेळ या दोहोंचीही बचत झाली आहे. त्यामुळे मेहनत कमी होऊन, खर्चातही कपात झाली आहे. अशाच शेतकऱ्यांच्या नवकल्पनांमुळे शेतीला नवी दिशा मिळणार आहे. स्मार्ट शेतकरी, उज्वल शेती!, अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
https://www.facebook.com/share/v/1FxQUPBvFX/
एकाच वेळी दोन कामे (Viral Video)
नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून “बैलांच्या अंगावर वा पायांवर जखम होऊ देऊ नका. छान डोकं लावलं. बैलाची काळजी घ्या”, “शेतकरी भाऊ प्रयोग करा. पण, आपल्या जीवाला जपा, बैलालापण जपा. तसेच खर्च कमी करण्याच्या नादात आणि अधिक उत्पन्नवाढीच्या नादात भाव मिळतो का तेही बघा”, “हुशार! एकाच वेळी दोन कामे केली”, “रॉयल शेतकरी”, “देवा, भाऊला बोलावून पुरस्कार दिला पाहिजे, खरोखरच खूपच छान प्रयत्न आहे”, “जय किसान, जय जवान नंबर एक जुगाड” अशा स्वरूपाच्या अनेकविध कमेंट्स व्हिडीओखाली नेटकरी करताना दिसून आले आहेत.