Viral Video : सोशल मीडियावर अनेक हटके व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके अचंबित करणारे असतात की पाहून विश्वास बसत नाही. सध्या असाच एक थक्क करणारा व्हिडीओ चर्चेच आला आहे. या व्हिडीओमध्ये तांदळाच्या पोत्यापासून सुंदर ड्रेस बनवलेला दिसत आहे. फॅशन शोमध्ये एक तरुणीने हा तांदळाच्या पोत्यांपासून बनवलेला ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. तिचा लूक पाहून तु्म्हीही थक्क व्हाल. आता पर्यंत तुम्ही फॅशन शो मध्ये अनेक प्रकारचे ड्रेस पाहिले असेल पण हा ड्रेस थोडा हटके आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुणी दिसेल. तिने सुंदर ड्रेस परिधान केलेला आहे. तिचा लूक खूप सुंदर दिसत आहे. सुरुवातीला तुम्हाला लक्षात येणार नाही की हा ड्रेस कशापासून तयार केला आहे पण नंतर नीट देऊन पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की हा ड्रेस चक्क तांदळाच्या पोत्यांपासून बनवलाय.तांदळाच्या पोत्यांपासून सुंदर फ्रॉक तयार केला आहे. या सुंदर फ्रॉकमध्ये तरुणी खूप सुंदर दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही क्रिएटिव्हीटीचे कौतुक कराल.हा व्हिडीओ एका फॅशन शोमधील आहे. व्हिडीओत फॅशन शोचे मोठे बॅनर आणि इतर पाहूणे मंडळीसुद्धा दिसत आहेत. ड्रेस चा अनोखा अंदाज आणि भन्नाट जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल. अशी क्रिएटिव्हीटी ही फक्त भारतातच दिसू शकते. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की जेव्हा ही तरुणी तांदळाच्या पोत्यांपासून बनवलेला ड्रेस परिधान करुन पोझ देताना दिसते तेव्हा सर्व पाहूणे आणि तेथील लोकं तिच्याकडे अवाक् होऊन बघतात. ती बिनधास्तपणे पोझ देताना दिसते.
हेही वाचा : दोन्ही हात नसताना देखील तरुणाने साकारले अप्रतिम रामलल्लांच्या मूर्तीचे चित्र, व्हिडीओ होतोय व्हायरल
lionize_world_records या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तांदळाच्या पोत्यांपासून बनवलेला ड्रेस” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप चांगली कल्पना आहे” तर एका युजरने लिहिलेय, “वॉटर प्रूफ आहे वाटते” आणखी एका युजरने तर या ड्रेसची किंमत विचारली आहे. काही लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे आणि काहींना हा जुगाड सुद्धा आवडलेला दिसतोय.