Viral video: आपल्या घराचा सगळ्यात मोठा आधार हे बाबा असतात. संपूर्ण कुटुंबाची काळजी देखभाल घेण्यासाठी रात्रदिवस मेहनत करत असतात मात्र तरीही मुलं बाबांपेक्षा आईच्याच जास्त जवळ असतात. कारण बापाचं नातं भावनिक कमी आणि कर्तव्य जास्त असतं. बाप म्हणजे धाक दरारा हे पूर्वी अनेकांसाठी समीकरण होतं. आई आपल्या आयुष्याच्या गाडीचं योग्य दिशा देणार “स्टीयरिंग” असतं तर अचानक आलेल्या संकटात सावरायला, “वडील” म्हणजे “अर्जेंट ब्रेक” चा पर्याय असतात. बाबा म्हणजे धाक, बाबा म्हणजे शिस्त हेच आपल्या डोळ्यासमोर येतं, कारण हाच बाबा आपल्याला जगण्यातली शिस्त शिकवत असतो. अशाच एका वडिल आणि मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल मात्र कारण कळाल्यानंतर तुम्हीही म्हणाल बाप असावा तर असा.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वडीलांनी आपल्या मुलानं अशाप्रकारे चुकीचं वागल्यामुळे त्याला शिक्षा दिली आहे. कॅन्सर झालेल्या मुलाला त्याच्या केसावरु चिडवल्यामुळे वडीलांनी त्याला त्याची जाणीव व्हावी म्हणून त्याचेही केस कापून टाकले आहेत. या व्हिडीओमध्ये तो लहान मुलगा मोठ मोठ्यानं रडत आहे, मात्र वडील काहीही न ऐकता मुलाचे केस कापत आहे. पुढे जाऊन त्यानं आयुष्यात अशाप्रकारे कुणाला दुखवू नये, कुणाचा अपमान करु नये तसेच समोरच्याच्या दुख:ची जाणीव करावी अशा हेतूनं त्याच्या वडिलांनी त्याला ही शिक्षा दिली. हा व्हिडीओ पाहून एका वडिलांची शिस्त काय असते हे पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Bryan Johnson diet: ४७व्या वर्षी पंचविशीतला दिसणारा अन् डाएटवर कोट्यावधी खर्च करणारा अब्जाधीश खातो ‘हे’ भारतीय पदार्थ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ brokebutmillionaire नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं म्हंटलंय, “हा मुलगा यापुढे कधीच कोणाला दुखावणार नाही.” तर आणखी एकानं म्हंटलंय की, “शिस्त लावणे खूप महत्त्वाचे आहे बरोबर केलं”