Father daughter Viral video: लेक माहेराचं सोनं, लेक सौख्याचं औक्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण… मुलींना परकं धन समजलं जातं. कारण- एक दिवस ती माहेरचं घर आणि नाव सोडून सासरी नांदायला जाते. पण, आई-वडिलांच्या मनातील मुलीचं स्थान मात्र कायम राहतं. मुलीची जागा कोणताही मुलगा घेऊ शकत नाही. मुली नेहमीच आई-वडिलांची सेवा करताना दिसतात. जी पोरगी आयुष्यभर आई-बापाच्या कुशीत वाढली, जिला हवं ते मिळत होतं, ती एका क्षणात दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होते. ज्या माहेरच्या घरात मुलगी लहानाची मोठी होते, त्या घरातून काढता पाय घेताना कोणत्याही मुलीचं अंत:करण जड होतं. मुलीचं हे हक्काचं घर क्षणात माहेर होतं. त्यानंतर ती कितीही वेळा माहेरी आली तरी पहिल्यासारखं काहीच उरत नाही. अशाच एका बाप-लेकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या जगात आल्यावर सर्वात आधी मुली कोणत्या पुरुषाला ओळखू लागतात, त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात, ज्याच्या जीवावर जगणं, हसणं, बोलणं, चालणं सुरु करतात तो असतो त्यांचा लाडका बाबा! खरं तर असं म्हटलं जातं की मुलगी या जगात येण्याआधीपासून तिच्यावर कोणी जीव ओवाळून टाकत असेल तर ते वडिल असतात. आपल्या घरी लक्ष्मीचं आगमन व्हावं आणि तिचं स्वागत करता यावं यासाठी काही काही पुरुष तर ९ महिने डोळे लावून वाट पाहत असतात. जन्माला आल्यानंतर आई त्या बाळाचं खाणं-पिणं पाहते पण वडिल मात्र तिच्या उठण्यापासून झोपेपर्यंतच्या वेळात तिच्याकडे कौतुकाने पाहत तिची प्रत्येक गोष्ट आपुलकीने करतो. कधीतरी आपली लेक मोठी होणार आणि उंबरठा ओलांडून सासरी जाणार हे माहित असूनही आपल्या श्वासापेक्षा जास्त जपतो आणि गरजेपेक्षा अधिक देण्यात कमी पडत नाही ते वडिल असतात.
असेच एक वडिल आपल्या लेकीला लग्नात तयार झाल्यानंतर पहिल्यांदा पाहतात आणि भावूक होतात,आनंदी होतात.नवरी झालेल्या लेकीला पहिल्यांदाच पाहून वडिलांचा आनंद गगनात मावत नाहीये. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओमधून बाप-लेकीचं प्रेम पाहायला मिळालं आहे. ते म्हणतात बापाला लेकीचं कौतुक जरा जास्तच असतं हेच या व्हिडीओतून पाहायला मिळतंय.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ सोशल मीडियावरील sanskruti_gaikwad_makeup_hair नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. एका युजरनं यावर “कन्यादान” अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका युजरनं लेक प्रत्येकाच्या नशिबी नसते. लेक माहरेचं सोनं असते, अशी कमेंट केलीय.