वडील आणि मुलीमध्ये नेहमी एक सुंदर नातं असतं. मुलींच्या आयुष्यात वडिलांची भूमिका खूप महत्त्वपूर्ण आहे. मुली वडिलांवर डोळे बंद करुन विश्वास ठेवतात. मुलांच्या इच्छा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी पालक सतत मेहनत करत असतात. आपल्या मुलाला जगातील सर्व सुख मिळावे अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. मुलगी नको म्हणणाऱ्यांना काही वडिल जबरदस्त चपराक लावतात. आपल्या मुलीलाही कोणत्या मुलापेक्षा कमी न समजता प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याचं पाठबळ वडिल देतात. असाच एक बाप-लेकीच्या विश्वासाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यात एक वडील आपल्या मुलीला पोहायला शिकवण्याचा प्रयत्न करताना दिसले. मुलगीही वडिलांवर विश्वास ठेवून समुद्रात उडी मारायला तयार झाली. मात्र या उडीनंतर जे घडलं, ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. मुलगी खूप लहान आहे, त्यामुळे वडिलांनी तिच्या दोन्ही हातात एअर बॅग ठेवल्या होत्या. या एअर बॅग्समुळे ती पाण्यात पडताच वरती तरंगेल आणि पोहायला सुरुवात करेल, असं वडिलांना वाटलं. पण असं झालं नाही. वडिलांनी आपल्या मुलीला पाण्यात टाकताच तिच्या हातातून दोन्ही एअर बॅग बाहेर आल्या आणि मुलगी पाण्याच्या तळाला जाऊ लागली.

दरम्यान यात व्हिडीओ बंद झाला आहे, पुढे त्या मुलीचं काय झालं याचाच सगळे विचार करत असून अजुन काही माहिती याबद्दल मिळाली नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: वडाच्या झाडाच्या आत आहे ४५ वर्ष जुनं चहाचं दुकान; बघून आनंद महिंद्राही झाले हैराण, म्हणाले पुढच्या वेळी नक्की…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकरीही यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.