Father Viral Video: बाप आणि लेकीचं नातं अगदी खास असतं. काळजाच्या तुकड्यासारखा आपल्या लेकीला जपणारा हा बाप अनेक संकटांना सामोरा जात असतो. अगदी जन्म दिल्यापासून ते मोठं होईपर्यंत बाप आपल्या लेकीला सांभाळण्याची, त्याचं रक्षण करण्याची आपली जबाबदारी कधीच विसरत नाही. लहान-मोठ्या सगळ्या संकटात तो आपल्या मुलांबरोबर खंबीरपणे उभा राहतो.
बाप होणं काही सोप नसतं हे म्हणतात ते खरंच. बापावर जबाबदाऱ्यांचं ओझं असतं. आपल्या लेकरांसाठी धडपडणारा बाप अनेकदा दु:ख मनात ठेवून, त्यांच्यासाठी झिजत असतो. सकाळी कामावर जातो आणि थकून भागून रात्री घरी येतो. आपल्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल व्हावं हे प्रत्येक बापाला वाटत असतं. म्हणून त्याची दिवस-रात्र धडपड सुरूच असते. पण ही धडपड प्रत्येक लेकराला कळेल असंही नाही. सध्या सोशल मीडियावर एका बापाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुमचेही डोळे पाणावतील.
बापाचा व्हिडीओ व्हायरल (Father Emotional Video Viral)
आज फादर्स डे दिवशी सोशल मीडियावर एक सुंदर व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक बाप कसा दोन्ही जबाबदाऱ्या एकत्र पार पाडत आहे.
व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, ट्रेनच्या दरवाजाच्या बाजूला एक बाप बसला आहे. एका बाजूला त्याच्या मांडीवर डोक ठेवून त्याची बायको झोपली आहे, तर दुसऱ्या बाजूला तो त्याच्या लहान मुलीचे केस विंचरताना दिसतोय. या ट्रेनच्या गर्दीत ते कुटुंब अगदी सुखी दिसतंय. दरम्यान, व्हायरल झालेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप कळू शकले नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @may_marathi_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसंच या व्हिडीओला “बापाचं असं रूप फार कमी लेकरांच्या वाट्याला येतं” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तर व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल २६ लाखांपेक्षा व्हयुज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “बाप हा बापच असतो” तर दुसऱ्याने “बापाचं काळीज समजायला भाग्य लागतं” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “बापाचं लेकीवर प्रेम जरा जास्तच असतं”