Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ खूप मजेशीर असतात तर काही व्हिडीओ खूप भावनिक असतात. सध्या असाच एक बाप-लेकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोराला स्टेजवर पाहून वडिलांचे अश्रू अनावर होताना दिसत आहे. वडिलांचे प्रेम पाहून तुम्हीही भारावून जाल. काहींना व्हिडीओ पाहून त्यांच्या वडिलांची आठवण येईल.

आईवर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आईचे प्रेम जगजाहीर आहे पण वडिलांविषयी फार काही बोलले जात नाही. वडिलांच्या प्रेमाकडे कधीही आपले लक्ष नसते पण आई इतकेच प्रेम वडील सुद्धा आपल्या मुलांवर करत असतात. या व्हिडीओत सुद्धा तुम्हाला वडिलांचे मुलावर असलेले प्रेम दिसून येईल.

हा व्हायरल व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल एका स्टेजवर मुले नाटक सादर करत असतात. स्टेजसमोर लोकांची भयंकर गर्दी असते. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की या गर्दीमध्ये एका कोपऱ्यात एक व्यक्ती नाटक बघताना दिसते. मुलाचे नाटक पाहताना या व्यक्तीला अश्रु अनावर होतात. मुलाचे नाटक बघायला ही व्यक्ती आलेली असते. पोराला स्टेजवर पाहून या वडिलांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी, चेहऱ्यावर हास्य आणि उत्साह दिसून येतो. टाळ्या वाजवून ते मुलाला प्रोत्साहन देताना दिसून येतात. हा व्हिडीओ पाहून अनेकांना रडू येईल. काहींना त्यांचे वडील आठवतील तर काहींना त्यांचे शाळेचे दिवस आठवतील. हा व्हिडीओ एका शाळेतील असू शकतो. शाळेच्या कार्यक्रमात विद्यार्थी स्टेजवर नाटक सादर करताना दिसत आहे.

हेही वाचा : तुम्ही मराठी शाळेत शिकलाय का? फळ्यावर सर्वात जास्त लिहिला जाणारा सुविचार कोणता? तरुणीच्या प्रश्नाला नेटकऱ्यांची भन्नाट उत्तरे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

kalyughumour या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”खरं प्रेम” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून डोळ्यांत पाणी आले” तर एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून अंगावर काटा आला” आणखी एका युजरने लिहिलेय, “ह्रदयस्पर्शी व्हिडीओ” अनेक युजर्सना व्हिडीओ पाहून त्यांच्या वडिलांची आठवण आली आहे. काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.