मेट्रो किंवा लोकलमध्ये प्रवाशांची भांडणे होणे आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होणं हे काही नवीन नाही. कारण कोणत्या ना कोणत्या कारणावरुन प्रवासादरम्यान अनेक लोकांची भांडणे होत असतात. अनेकदा ही भांडणं हाणामारीवर येऊन पोहचतात. कधी सीटवरून तर कधी लोकलमध्ये उभं राहण्यावरून असे वाद होतात. सध्या मुंबई लोकलमधील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन प्रवासी एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. पण धक्कादायक बाब म्हणजे यातील एक प्रवासी समोरच्या व्यक्तीचा गळा दाबून त्याला चक्क लोकलमधून खाली ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे

दोघांचं भांडणं पाहून घाबरले प्रवासी –

Shiv Panvel Highway, Accident, Accident on Shiv Panvel Highway, Ola App Passengers, Raises Safety Concerns, ola drivers, ola cab, marathi news, panvel news, panvel, accident news,
शीव-पनवेल महामार्गावरील रात्रीच्यावेळी प्रवास सुरक्षित आहे का ?
Mumbai, BEST, Mumbai BEST buses,
मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

या भयानक भांडणाचा व्हिडीओ मुंबई मॅटर्स नावाच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही प्रवासी लोकलच्या दरवाजात उभे राहिल्याचं दिसत आहे. यावेळी काही कारणावरुन या दोघांमध्ये वाद होतो. हा वाद इतका वाढतो की, दोघांपैकी एक व्यक्ती दुसऱ्याचा गळा आपल्या हातांनी पकडतो आणि त्याला लोकलमधून खाली ढकलण्याचा प्रयत्न करतो. समोरचा प्रवासी खाली पडणार इतक्यात तो ट्रेनमधील लोखंडी ग्रील पकडतो ज्यामुळे तो बचावतो. परंतु, प्रवाशाने केलेलं हे भयानक कृत्य पाहून इतर प्रवासी त्याच्यावर ओरडतात. यावेळी ते, “अरे, वेडा आहेस का.. आत ये.” असं म्हणत असल्याचं व्हिडीओत ऐकू येत आहे.

हेही पाहा- रोपे लावण्यासाठी शेतकऱ्यांचा अनोखा जुगाड; एका व्यक्तीच्या पायाला दोरी बांधून फरपटत नेल्याचा VIDEO पाहून डोकंच धराल

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

व्हिडीओ पाहून अंदाज लावता येऊ शकतो की या भांडणादरम्यान, थोडीशी चूक झाली असती तर दरवाजातील प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला असता. या प्रवाशांचा भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, “हे लोकल ट्रेनमध्ये रोजचेच झाले आहे.” तर दुसर्‍याने लिहिलं, “छोट्या गोष्टीवरून तुम्ही एकमेकांचा जीव घेणार का?”

खरं तर, मेट्रो किंवा लोकल ट्रेनच्या डब्यांमध्ये हाणामारी होणं ही काही नवीन गोष्ट नाही. अशी प्रकरणे यापूर्वीही समोर आली आहेत. नुकताच सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये काही महिला लोकल ट्रेनमध्ये चढण्यासाठी धोकादायक पद्धतीने धक्काबुक्की करताना दिसत होत्या. तर आणखी एका व्हिडीओमध्ये, खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये दोन महिला सीटवरुन एकमेकीशी जोरजोरात भांडू लागतात. यावेळी एक महिला दुसऱ्या महिलेला जोरात कानाखाली वाजवते, यानंतर दोघींची मारामारी सुरु होते आणि दोघी एकमेकींचे केस ओढायला सुरुवात करताना दिसत होत्या.