Finland PM Sanna Marin Viral Video: फिनलँडच्या पंतप्रधान सना मारिन यांचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओ मध्ये आपल्या मित्रांसह एका घरात पार्टी मध्ये सना नाचताना दिसत आहेत. जवळपास सर्वच सोशल मीडिया साईट्सवर या व्हिडिओला लाखो युजर्सनी पाहिले आहे. खरंतर एखाद्या वीकएंडला साधारण जगभरातील अनेक तरुण अशाच प्रकारच्या पार्टी करतात हे काही नवीन नाही पण सना यांचं पार्टी करणं सध्या वादाचा मुद्दा ठरलं आहे. हा व्हिडीओ पाहून फिनलँडच्या विरोधी पक्षांनी सना मरिन यांना दारू पिऊन असे धिंगाणे करणे शोभत नाही अशी भूमिका घेत त्यांना त्वरित ड्रग टेस्ट करून देण्याचा सल्ला दिला आहे.

दुसरीकडे, इंस्टाग्राम स्टोरी मध्ये पोस्ट केलेला हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अनेक सोशल मीडिया युजर्सनी सना यांना पाठिंबा सुद्धा दिला आहे. पंतप्रधान असल्यावर आयुष्य जगण्याचा अधिकार नसतो का? असे प्रश्न करत सना यांच्या व्हिडीओचे अनेकांनी कौतुक सुद्धा केले आहे.

पहा फिनलँडच्या पंतप्रधानांचा Viral डान्स

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची पंतप्रधानांवर टीका? म्हणाले ‘देशाला खोटे आश्वासन..’, Viral Video मागे ‘हे’ आहे सत्य!

पंतप्रधांनांची प्रतिक्रया

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधान सना मरीन यांनी पुढाकार घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. आपण या पार्टी मध्ये डान्स केला, गाणी गायली यात काहीच अवैध किंवा गैर नाही. कोणतेही ड्रग किंवा दारूचे सेवन केलेले नाही. हा माझ्या मित्र मैत्रिणींसोबतचा खाजगी व्हिडीओ आहे त्यावरून टीका करण्याची गरज नाही असेही मरीन यांनी म्हंटले आहे. आपण विरोधकांच्या सांगण्यावरून कोणतीही ड्रग टेस्ट करणार नाही असे ठाम उत्तर मरीन यांनी दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अशा प्रकारे वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची ही पंतप्रधान मरीन यांची पहिलीच वेळ नाही यापूर्वी मागच्या वर्षी कोविड नियमावली मोडून त्या एका क्लब मध्ये गेल्या होत्या. हा प्रकार समोर आल्यावर सना यांनी सर्वांची क्षमा मागितली होती. सना मरीन या जगातील सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान आहेत अलीकडेच जर्मन आउटलेट तर्फे त्यांना कुलेस्ट पीएम म्हणून गौरवण्यात आले होते.