Fire Stunt Viral Video: रस्त्यावर खेळ करुन आपला उदरनिर्वाह करणारे असंख्य लोक दररोज पाहायला मिळतात. असे लोक जत्रेच्या ठिकाणी जाऊन तेथील गर्दीसमोर खेळ करुन पोट भरत असतात. या खेळांमध्ये डोबऱ्याचा खेळ, नाचगाणी अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. यातील सर्वात भयानक गोष्ट म्हणजे आगीचा खेळ. यात एक व्यक्ती पेट्रोल किंवा तेल तोंडामध्ये भरतो. पुढे समोर पेटलेल्या लाकडाचा तुकडा धरत तोंडातील पेट्रोल बाहेर काढतो. असे केल्याने तोंडातून आग काढल्याचा भास होतो. हा खेळ पाहायला जत्रांमध्ये मोठी गर्दी होत असते.

हा आगीचा खेळ पाहायला चित्तथरारक असला, तरी तो धोकादायक असतो. काही वेळेस हा खेळ फसल्यास आसपासच्या एखाद्या वस्तूला आग लागू शकते. असाच एक फसलेल्या आगीच्या खेळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात एक तरुण व्यक्ती गर्दीसमोर तोंडातून आग बाहेर काढण्याचा खेळ दाखवताना दिसतो.

व्हिडीओच्या सुरुवातीला एका हातामध्ये पेट घेतलेलं छोटं लाकूड आणि दुसऱ्या हातात पेट्रोलची बाटली पकडून उभा असतो. पुढे तो पेट्रोल तोंडामध्ये भरतो आणि तोंडासमोर लाकूड धरुन पेट्रोल बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. ही कृती करत असताना काही सेकंदांसाठी सर्वकाही व्यवस्थित आहे असे वाटते. पण अचानक त्यांच्या तोंडाला आणि कपड्यांना आग लागते. पेट घेतल्यावर त्यांचा चेहरा जळाल्याचे व्हिडीओत दिसते. तोंडातून पेट्रोल बाहेर काढताना चूक झाल्याने हा अपघात घडतो. चेहरा आणि शर्टाला लागलेली आग पसरायला लागते. क्षणार्धात आसपासचे लोक ती आग विझवण्याचा प्रयत्न करतात. पुढे त्याच्या शरीराला लागलेली आग विझते. पण तोपर्यंत त्या व्यक्तीचा चेहऱ्याला गंभीर दुखापत झालेली असते.

आणखी वाचा – Video: रेल्वेरुळाच्या शेजारी Reel बनवणं तरुणाला पडलं महागात; चालताना मागून वेगवान ट्रेनने दिली धडक आणि पुढे…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@clipsthatgohard या ट्विटर अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे. फक्त ४० सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ९० हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अनेक यूजर्सनी हा व्हिडीओ शेअर देखील केला आहे. भयानक व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. बऱ्याच जणांनी तरुणाला मदत करणाऱ्या लोकांचे कौतुक केले आहे. तर काहींनी आगीशी खेळ न करण्याचा सल्ला दिला आहे.