French Actress Held Hostage: फ्रेंच अभिनेत्री मारियान बोर्गो, हिने पोलिसांनी आपल्याला उत्तर गोव्यातील निवासस्थानी ओलीस ठेवल्याचा आरोप केला होता. मालमत्तेच्या वादातून ११ दिवसांच्या कठोर पहाऱ्यानंतर गुरुवारी रात्री तिची सुटका करण्यात आली. कलंगुट बीच परिसरात असलेले घर सोडताना, बोर्गोने एका निवेदनात तिच्या अनुभवाबद्दल निराशा व्यक्त केली आहे. यावेळी थेट मोदींना निशाणा करून अभिनेत्री बोर्गोने नाराजी वर्तवली आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार 75 वर्षीय बोर्गो म्हणाल्या की “पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील पर्यटनाला चालना देणारे एक सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा जगभर प्रयत्न करत आहेत. परंतु अलीकडील घटनांमुळे माझी पूर्ण निराशा झाली आहे. मला वाटते की गोव्यात राज्य पातळीवर या प्रयत्नांना यश मिळू शकले नाही.

गोवा पोलिसांनी यापूर्वी म्हटले होते की हा वाद दिवाणी स्वरूपाचा असल्याने आणि न्यायालयात त्याची सुनावणी सुरू आहे. असे म्ह्णून पोलीस या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास टाळाटाळ करत होते असेही अभिनेत्रीने म्हंटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

उत्तर गोव्याचे एसपी निधीन वल्सन यांनी एएनआयला सांगितले की, “बोर्गो यांच्यासह ज्या मालमत्तेचे वाद सुरु आहे त्यात मालक असल्याचा दावा करणारे दोन पक्ष आहेत. एक फ्रेंच अभिनेत्री आणि दुसरी महिला नेपाळची रहिवासी आहे. हे प्रकरण दिवाणी न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच अभिनेत्रीने पोलिसांवर ओलिस ठेवल्याच्या आरोपांची पुष्टी करता येणार नाही कारण यावेळी सर्वच ‘कोणत्याही बंधनाविना’ वावरत होते.”

पोलिसांनी काय सांगितले?

पुढे पोलीस म्हणतात की, “ओलिस ठेवल्याच्या आरोपाबाबत, आमच्या पोलिस निरीक्षकांनी मालमत्तेला भेट दिली आहे. फ्रेंच महिला आणि त्यांच्याकडे कामासाठी येणारी महिला घरातील एका खोलीत राहत होत्या. त्यांनी दोन खाजगी सुरक्षा कर्मचारी ठेवले आहेत. दुसरा पक्ष म्हणजेच नेपाळच्या महिलेलाही सुरक्षा देण्यात आली आहे. “

दरम्यान, मारियाने आरोप केला होता की ज्या लोकांनी तिच्या मालमत्तेवर दावा केला आहे त्यांनी घराचे पाणी आणि वीज कनेक्शन खंडित केले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, मारिया म्हणाली की तिने २००८ मध्ये फ्रान्सिस्को सौसा नावाच्या वकिलाकडून हे घर विकत घेतले होते परंतु साथीच्या आजाराच्या वेळी सौझाचा मृत्यू झाला. हे घर सेवानिवृत्तीसाठी नंतर आराम करण्यासाठी घेतले होते पण यातून मनस्तापच अधिक होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मारियान बोर्गो कोण आहे?

मारियान बोर्गो ही संपूर्ण युरोप आणि भारतातील चित्रपट, टेलिव्हिजन आणि थिएटरमधील तिच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. केट हडसन, ग्लेन क्लोज आणि स्टीफन फ्राय यांच्यासह द बॉर्न आयडेंटिटी, अ लिटल प्रिन्सेस आणि फ्रँको-अमेरिकन रोम-कॉम “ले डिव्होर्स” यामध्ये ती झळकली आहे. तिने अलीकडेच “डॅनी गोज ऑम” या भारतीय कलाकृतीसाठीही काम केले होते.