हरिद्वारमध्ये एका रीलच्या नादात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक तरुण संरक्षण कुंपण ओलांडून नदीत पोहायला जातो अन् त्याचा बुडून मृत्यू होतो. धक्कादायक बाब म्हणजे नदीच्या काठावर उभा राहून त्याचा मित्र हे दृश्य कॅमेऱ्यात हा जीवघेणा क्षण रेकॉर्ड करतो. एक मिनिट १५ सेकंदामध्ये ( ७५ सेकंद) त्याचे आयुष्य संपले. ही घटना रविवारी गोविंदपुरी घाटावर घडली.
उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील रहिवासी ४० वर्षीय विकास असे मृत तरुणाचे नाव आहे. तो त्याच्या मित्रांसह उत्तराखंडला तीर्थयात्रेसाठी आला होता.
संरक्षण कुंपण ओलांडून नदीत पोहायला गेला अन्….
विकास पवित्र स्नानासाठी गंगा नदीत गेला. ज्यासाठी त्याने संरक्षण कुंपण ओलांडून खोल पाण्यात उडी मारली. काही अंतर पोहत गेल्यानंतर तो पाण्याच्या जोरदार प्रवाहात तो वाहून गेला आणि बुडाला. हे सर्व दृश्य त्याचा मित्र मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असल्याचे दिसत आहे. व्हायरल व्हिडीओ हा एक मिनिट १५ सेकंदांचा (७५ सेंकादाचा) आहे.
मृतदेह सापडला, शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला
पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांना बोलावून मृतदेहाची ओळख पटवली आहे. त्यानंतर, मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
पोलिस अधिकारी अमरजीत सिंह यांनी अमर उजाला यांना सांगितले की, “मृतदेह कुटुंबातील सदस्यांना सोपवण्यात आला आहे. वृत्तपत्रात असेही म्हटले आहे की, “माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि शोध मोहीम सुरू केली, परंतु तरुणाचा शोध लागला नाही आणि सोमवारी सकाळीच मृतदेह सापडला.”\
२४ तासांनंतर त्याचा मृतदेह सापडला. पोलिसांनी पाथरी पॉवर हाऊसजवळून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
मृत तरुणाचे मित्रांनी त्याला नदीत स्नान करण्यासाठी संरक्षण कुंपण ओलांडताना पाहिले पण त्यांनी पाण्यात उडी मारून विकासला वाचवण्याऐवजी घटनास्थळावरील व्हिडिओ शुट करत राहिले. ही घटना सोशल मीडियावर व्हिडिओ बनवताना निष्काळजीपणामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आणखी एक धडा बनली आहे आणि गंगेत स्नान करताना काळजी घेण्याची आणि सुरक्षितता नियमांचे पालन करण्याची आठवण करून देणारी आहे.